बेंगळुरू (कर्नाटक) - रा.स्व. संघ आणि बजरंग दल यांच्या विरोधात कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली.
याआधी सिद्धरामय्या यांच्या विरोधात ४२ व्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात याच प्रकरणात सुनावणी झाली होती. त्या न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्या आदेशाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आता फेटाळून लावली.
विधानसभेत बोलतांना सिद्धरामय्या यांनी राज्यातील बहुतांश गुन्हेगारी कृत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल उत्तरदायी असल्याचा आशय व्यक्त करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत किरण नावाच्या व्यक्तीने सिद्धरामय्या यांच्या विरुद्ध खासगी तक्रार प्रविष्ट केली होती.

