Dailyhunt
'ओंकार' हत्तीची मोपा येथे नासधूस

'ओंकार' हत्तीची मोपा येथे नासधूस

पेडणे - 'ओंकार' हत्तीने मोपा भागात पुन्हा प्रवेश करून शेती-बागायती यांची हानी केली आहे. 'ओंकार' हत्तीने ४ एप्रिलच्या उत्तररात्री १.३० वाजता सिंधुदुर्गमधील नेतर्डे गावातून कडशी, मोपा येथे प्रवेश केला.

पेडणे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी गोव्यात प्रवेश करत असलेल्या 'ओंकार'ला परत महाराष्ट्राच्या दिशेने परतवून लावण्याचा प्रयत्न केला; मात्र महाराष्ट्राच्या बाजूने अगोदरच मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित असल्याने तो मागे जाऊ शकला नाही. सध्या वन विभागाचे अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi