Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'पॅलेट गन'च्या वापरावर सध्या बंदी नाही ! - सर्वोच्च न्यायालय

'पॅलेट गन'च्या वापरावर सध्या बंदी नाही ! - सर्वोच्च न्यायालय

(पॅलेट गन म्हणजे छर्रे (धातूचे अतिशय लहान गोल किंवा सूक्ष्म तुकडे) झाडणारी बंदूक)

नवी देहली - जोपर्यंत 'पॅलेट गन'च्या वापरास अनुमती देणार्‍या पोलीस नियमांना आव्हान दिले जात नाही, तोपर्यंत यावर बंदी घालण्याचा आदेश देणे कठीण आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने 'पॅलेट गन'च्या वापरास बंदी घालण्यास नकार दिला.

तसेच पॅलेट गनच्या वापराशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांवर केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने देहली सरकारला आदेश दिला की, आंदोलनात घायाळ झालेल्या सर्व लोकांना चांगली आणि पूर्ण वैद्यकीय सुविधा दिली जावी.

Supreme Court on Pellet Guns

The Supreme Court observed that police rules permit the use of pellet guns in exceptional circumstances.

The Court noted that pellet guns form part of the graded use-of-force approach, unless the underlying rules authorising their use are… pic.twitter.com/TFp7A9MlmU

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

माजी आय.पी.एस्. (इंडियन पोलीस सर्व्हिस - भारतीय पोलीस सेवा) अधिकारी यशोवर्धन आझाद, प्रशांत कुमार सिंह आणि शेख इरशाद मन्सूरी यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यात दावा करण्यात आला होता की, २० जुलै २०२६ या दिवशी कॉकरोच जनता पक्षाच्या संसदेवरील मोर्चाच्या वेळी धडक कृती दलाने (रॅपिड ॲक्शन फोर्सने) विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi