पुणे - पारगाव (ता. दौंड) येथील 'न्यू इंग्लिश स्कूल'मध्ये शिक्षण घेणार्या सख्ख्या बहिणींचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी खुटबाव येथील युवक प्रवीण गणपत थोरात आणि दिनेश दत्तात्रय पासलकर यांना अटक करण्यात आली.
त्यांच्यावर 'पॉक्सो'अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या युवकांनी २० आणि २७ जुलै या दिवशी बहिणींचा विनयभंग केला. या मुली शाळेतून घरी येत असतांना आरोपींनी चारचाकी आडवी लावली. 'तू मला आवडतेस' असे म्हणत एका मुलीचा हात पकडला.
जवळ ओढून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. मुलींच्या वडिलांनी शाळेतील प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समितीने पोलिसांना कळवले. त्यानंतर २८ जुलै या दिवशी गुन्हा नोेंद करण्यात आला. (पोलिसांचा धाक संपल्याने कुणीही गुन्हा करण्यास धजावत आहे. - संपादक)

