Friday, 30 Oct, 12.31 am सनातन प्रभात मराठी

होम पेज
फ्रान्सच्या चर्चमध्ये 'अल्ला हू अकबर'च्या घोषणा देत धर्मांधाने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ३ जण ठार

  • 'आतंकवाद्यांना धर्म नसतो' असे अजूनही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलत रहाणार आहे का ?
  • फ्रान्सने जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई चालू केली आहे. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. फ्रान्सने या घटनांमुळे न डगमगता जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट करावा, अशीच अपेक्षा !

नीस (फ्रान्स) - येथे 'नोट्रे डेम' चर्चमध्ये 'अल्ला हू अकबर'चे नारे देत एका धर्मांधाने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात एका महिलेसह ३ जण ठार, तर ३ जण घायाळ झाले. या महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. पोलिसांनी धर्मांध आक्रमणकर्त्याला अटक केली आहे. 'हे आतंकवादी आक्रमण असू शकते', असे फ्रान्सच्या पोलिसांनी म्हटले आहे, तर नीस शहराचे महापौर ख्रिश्‍चियन एस्ट्रोसी यांनी 'हे आतंकवादी आक्रमण आहे' असे म्हटले आहे.

फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून 'शार्ली हेब्दो' या नियकालिकातील महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्रावरून वाद चालू आहे. एका धर्मांधाने ही व्यंगचित्रे दाखवल्यामुळे एका शिक्षकाचा शिरच्छेद केला होता. त्यानंतर फ्रान्स सरकारने जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई चालू केली आहे, तर इस्लामी देशांकडून फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहीम चालवण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi
Top