पुणे - महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने मे महिन्यामध्ये सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत शहरातील रुग्णालयांची पडताळणी मोहीम राबवली होती. यामध्ये 'फायर अलार्म', 'स्मोक डिटेक्टर', अग्नीशामक यंत्रे, 'फायर हायड्रेटर', 'फायर लिफ्ट' आणि आपत्कालीन मार्ग यांची पहाणी केली.
रुग्णालयातील कर्मचार्यांना अग्नीसुरक्षेचे प्रशिक्षण, उपकरणांची माहिती, देखभाल आणि ना-हरकत दाखल्याचे वार्षिक नूतनीकरण बंधनकारक असल्याचे सांगितले. या पडताळणी मोहिमेत २६० रुग्णालयांनी अग्नीशामक परीक्षण करून व्यावसायिक आणि अग्नीसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र घेतले. उर्वरित ४१४ रुग्णालयांकडे हे प्रमाणपत्र नसल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आधुनिक वैद्य लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

