Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PP Sarsangchalak Dr. Mohanji Bhagwat : 'भारतात एकही मुसलमान नको', असे म्हणणारा हिंदु स्वतः हिंदु नसेल !

PP Sarsangchalak Dr. Mohanji Bhagwat : 'भारतात एकही मुसलमान नको', असे म्हणणारा हिंदु स्वतः हिंदु नसेल !

न्यूयॉर्क (अमेरिका) - मुसलमान बांधवांनी वर्ष २०१८ मध्ये मला विचारले, 'तुम्ही हिंदु संघटना आहात आणि हिंदु राष्ट्राबद्दल बोलता; मग मुसलमानाचे काय ? तुम्ही आम्हाला बाहेर काढणार का?' मी त्यांना म्हणालो, ''नाही, ते हिंदुत्व नाही.

जर एखाद्या हिंदूला वाटत असेल की, भारतात एकही मुसलमान नको, तर तो स्वतः हिंदु नसेल. जर तुम्ही हिंदु असाल, तर तुमचा विश्‍वास असला पाहिजे की, सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे जातात आणि प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा आहे. तुमच्यात आणि त्यांच्यात कोणताही भेद नाही, असे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' (जागतिक एकात्मता उत्सव) असे नाव असलेल्या कार्यक्रमात बोलतांना केले. या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे मुसलमान महापौर जोहरान ममदानी, तसेच अमेरिकी धार्मिक आयोग यांनी विरोध केला होता. या कार्यक्रमाला विविध धर्मांचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते.

He also stressed unity in diversity, one humanity despite different religions, loyalty towards one's karmabhoomi, and said present-day politics has become a game of self-interest.

- Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat)

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या 'डी.एन्.ए.'मध्ये (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक अ‍ॅसिड म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) एकता आणि विविधता सामावलेली आहे. अमेरिकेच्या संदर्भात 'बहुविधता' हा शब्द अनेकदा वापरला जातो. जेव्हा आपण भारताचा विचार करतो, तेव्हा 'विविधतेतील एकता' ही संकल्पना चर्चेत येते. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, 'प्रत्येक राष्ट्राला एक नियती किंवा ध्येय पूर्ण करायचे असते.' भारताच्या वाट्याला आलेली नियती काय आहे ? तर 'विविधतेतील एकता' हे तत्त्व स्वतः अनुभवणे आणि वेळोवेळी जगाला त्याची जाणीव करून देणे, हे भारताचे कार्य आहे.

मी धर्मगुरु नाही किंवा तुमच्यासारखा (इतर धर्मगुरूंना उद्देशून) धार्मिक विद्वान नाही; पण मी अशा समाजात काम करतो, जिथे असे मानले जाते की, धर्म वेगवेगळे असले, तरी मानवता एक आहे. सत्य एकच आहे आणि मानवता हे सत्याचेच फळ आहे. त्यामुळे मानवताही एकच आहे. पण त्याचे वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते; कारण मानवाच्या डोक्यात जे सॉफ्टवेअर बसले आहे, त्याचे सर्व बंदीवान आहेत.

जर आपण समाजाला शिक्षित केले नाही, तर त्यामुळे समाजाची दिशाभूल होते. इतिहासात हे कसेतरी घडले तो क्षण मी निश्‍चितपणे सांगू शकत नाही. भारताने इतिहासात अनेक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांना आश्रय दिला आहे. आपला समाज आणि आपला देश परकीय आक्रमणांचे लक्ष्य बनला आणि अनेक गोष्टी गमावल्या गेल्या; पण परंपरा मात्र कायम आहे. ती सामान्य माणसाला एक गोष्ट शिकवते, ती म्हणजे एक जग, एक मानवता.

जगात अनेक धर्म आहेत. आज धर्मांची ओळख प्रामुख्याने त्यांच्या धार्मिक विधींवरून होते. धार्मिक शिस्त अंगीकारण्यासाठी आणि ईश्‍वरापर्यंत पोचण्याच्या त्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी धार्मिक विधींचे पालन करणेही आवश्यक आहे.

आजचे राजकारण हा स्वार्थाचा खेळ बनला आहे. संघात आम्ही केवळ देण्याचे काम करतो आणि तेही कोणत्याही अपेक्षेविना. लोकशाहीत लोकमत महत्त्वाचे असते. जर जनमानस सिद्ध असेल, तर कोणताही नेता त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही.

'आम्ही अमेरिकेत आहोत. आम्ही अमेरिकेत रहातो. आम्ही अमेरिकेत कमावतो. त्यामुळे आम्ही अमेरिका आहोत. आणि आम्ही अमेरिकेशी प्रामाणिकपणे वागले पाहिजे', ही अमेरिकेतील भारतियांमध्ये असलेली भावना योग्य आहे. परदेशातील भारतियांचे त्यांच्या कर्मभूमीप्रती एक कर्तव्य आहे आणि हे दायित्व न डावलताही ते भारतासाठी योगदान देऊ शकतात. त्यांनी ते कर्तव्य पूर्ण केलेच पाहिजे. त्यांनी त्यांच्या कर्माशी एकनिष्ठ राहिले पाहिजे; कारण भारत ही त्यांची जन्मभूमी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi