Friday, 30 Oct, 12.31 am सनातन प्रभात मराठी

होम पेज
पुलवामा येथील आक्रमण पाक सरकारनेच केल्याची पाकच्या मंत्र्याची स्वीकृती

पाकने दिलेल्या या स्वीकृतीनंतर आता भारताने आंतररारष्ट्रीय स्तरावर कागदी घोडे न नाचवता थेट पाकवर आक्रमण करून त्याचा सूड घेतला पाहिजे !

फवाद चौधरी व इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) - गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये काश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर करण्यात आलेले आक्रमण इम्रान खान सरकारचे मोठे यश होते, असे विधान पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी पाकच्या संसदेत करून या आक्रमणामागे पाक असल्याची स्वीकृती दिली आहे.


फवाद चौधरी म्हणाले, ''पाकने पुलवामाच्या घटनेद्वारे भारताला कठोर उत्तर दिले आणि पाकच्या वायूदलाने स्वतःच्या क्षेत्रात घुसखोरी करणार्‍या शत्रूला (भारताला) मारले; मात्र संसदेत म्हटले जात आहे की, भारत आमच्यावर आक्रमण करणार होता. आम्हीच भारतात घुसून त्याला मारले आहे. पुलवामामध्ये जे काही यश मिळाले, ते इम्रान खान सरकारचे यश आहे.''

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi
Top