Dailyhunt
पुणे येथे ७ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी ३ पोलीस अधिकारी बडतर्फ !

पुणे येथे ७ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी ३ पोलीस अधिकारी बडतर्फ !

पुणे - एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे खंडणी मागितली. त्या प्रकरणात पोलीसदलातील 'रिल स्टार' सोनाली हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि सुदाम तायडे या तिघांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले.

पुण्यातील एका महाविद्यालयातील प्राचार्यांना 'पॉक्सो'च्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी वसूल केली. त्यांना 'एका अल्पवयीन विद्यार्थिनीला तुम्ही मेट्रो स्थानकावर बंदुकीचा धाक दाखवून गाडीमध्ये ओढले', अशी तक्रार तुमच्या विरोधात आली आहे', अशी भीती दाखवली. पीडित प्राचार्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचे अन्वेषण झाल्यानंतर संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi