पुणे, ३० जुलै (वार्ता.) - महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत प्रवास करून अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संपर्कात आल्यावर सर्वत्र प्रकर्षाने जाणवणारी समस्या म्हणजे कार्यकर्त्यांमधील 'अहंकार'; मात्र सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या साधकांच्या चेहर्यावरील सात्त्विक तेज अन् त्यांची अद्वितीय विनम्रता पाहून मन भारावून जाते.
हिंदुत्वाचे कार्य करणारा कार्यकर्ता कसा असावा ? याचा आदर्शच या साधकांनी स्वत:च्या आचरणातून घालून दिला आहे. धर्मकार्य असो वा ऐहिक कार्य, माणसाचा सर्वांत मोठा शत्रू 'अहं' हाच असून अहंनिर्मूलन करणे, हीच आजच्या काळाची सर्वांत मोठी आवश्यकता आहे. साधकांच्या अंगी असलेल्या या दैवी विनम्रतेतून मला नेहमीच प्रेरणा मिळते आणि 'देव, देश अन् धर्म' यांच्या रक्षणाचे कार्य अविरत अन् नम्रपणे करत रहाण्यासाठी एक मोठी आध्यात्मिक शक्ती मिळते, असे भावपूर्ण मनोगत सामाजिक विश्लेषक आणि 'सीए' (सनदी लेखापाल) श्री. सर्वेश मेहेंदळे यांनी व्यक्त केले. ते चिंचवड येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
यंदाचा 'गुरुपौर्णिमा महोत्सव' हा 'रामराज्याच्या निर्मितीची दिशा स्पष्ट करणारा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. हा उत्सव २९ जुलै या दिवशी पुणे जिल्ह्यात चिंचवड, तळेगाव, सिंहगड रस्ता, कोथरूड, हडपसर, भोर, जुन्नर, सातारा रस्ता अशा एकूण ८ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि श्री. नागेश जोशी, श्री. दीपक आगवणे, कु. क्रांती पेटकर, सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे, सौ. ज्योती दाते, डॉ. ज्योती काळे, श्री. केतन पाटील, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू श्री. सात्यकी सावरकर आदींनी उपस्थित जिज्ञासूंना 'रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघर्ष आणि दिशा' या विषयावर मार्गदर्शन केले.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ४ सहस्रांहून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
- श्री. सर्वेश मेहेंदळे, सामाजिक विश्लेषक
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली हिंदुत्वाची व्याख्या आणि विचार आजही अत्यंत प्रासंगिक असून, भारतभूमीला पितृभूमी अन् पुण्यभूमी मानणार्या सर्वांना एकत्र बांधणारा हिंदुत्व हाच खरा एकतेचा धागा आहे. आजच्या काळात देशविघातक आणि विभाजनवादी शक्तींचा बीमोड केल्याशिवाय 'रामराज्य' किंवा 'ईश्वरी राज्य' प्रस्थापित होऊ शकत नाही, यासाठी समाजात पौरुषत्व आणि स्वसंरक्षणाची तीव्र आवश्यकता आहे. पानिपतच्या बलीदानातून प्रेरणा घेत, देशाला आतून पोखरणार्या विघातक शक्तींचा नायनाट करण्यासाठी केवळ मूकप्रेक्षक न रहाता प्रत्येकाने या धर्म-समाज जागृतीच्या विचारांचा सक्रीय 'प्रचारक' बनून राष्ट्ररक्षणाच्या कार्यात योगदान देणे आवश्यक आहे, असे ओजस्वी मार्गदर्शन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू श्री. सात्यकी सावरकर यांनी केले. ते डेक्कन जिमखाना, पुणे येथील 'श्रुति मंगल कार्यालया'त आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
श्री. सात्यकी सावरकर यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, ही संस्था धर्म आणि समाज जागृतीचे मोठे कार्य करत असल्याचे सांगितले.

मनोबल वाढवून समस्यांवर मात करण्यासाठी, तसेच साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन सांगणारे 'स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया' आणि 'प्रार्थना' या २ 'ई-बुक'चे प्रकाशन कोथरूड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू श्री. सात्यकी सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. सनातन संस्थेच्या वतीने चिंचवड (पुणे) येथील 'जी.एम्.के. बँक्वेट्स अँड लॉन्स' या ठिकाणी श्री. चैतन्य तागडे आणि सामाजिक विश्लेषक श्री. सर्वेश मेहेंदळे यांच्या हस्ते 'सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
चिंचवड
१. श्री अभिषेक बारणे आणि श्रीमती अश्विनी जगताप
२. श्री. गणेश देशपांडे यांनी सभागृह उपलब्ध करून दिले.
चिंचवड
१. सनातनच्या ८५ व्या संत सौ. संगीता पाटील यांचा सन्मान सौ. चंदना अनिल कुंभार यांनी केला.
२. कार्यक्रमाला पू. केशव गिंडे यांची वंदनीय उपस्थिती लाभली, त्यांचा सन्मान श्री. शैलेंद्र शिंदे यांनी केला.
३. श्री. सर्वेश मेहेंदळे यांचा सत्कार श्री. नीलेश जोशी यांनी केला.
४. श्री. चैतन्य तागडे यांचा सत्कार श्री. प्रसाद हणमसागर यांनी केला.
चिंचवड
१. भाजपच्या नगरसेविका सौ. शैलजा अविनाश मोरे
२. शिवसेना नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस
३. भाजपचे माजी स्थायी समितीचे सभापती श्री. विलास मडेगिरी
हडपसर
हिंदुत्वनिष्ठ आणि गोरक्षक श्री. ऋषिकेश कामठे, भाजपचे फुरसुंगी आणि ऊरुळी देवाची मंडल यांचे अध्यक्ष श्री. राहुल हरपळे, फुरसुंगी-ऊरुळी देवाची येथील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. मोनिका पवार आणि सौ. उषा ढमाळ, 'चिंतामणी प्रासादिक दिंडी'चे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, कीर्तनकार ह.भ.प. राम महाराज सूर्यवंशी, पुणे महानगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक श्री. मारुति आबा तुपे यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली.
भोर
१. भोर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा अधिवक्ता सौ. जयश्री शिंदे,
२. श्री. अमित सागळे, गटनेते, भोर नगर परिषद, भाजप
३. भाजपचे नगरसेवक श्री. सुमंत शेटे
४. भाजप नगरसेवक श्री. जयवंत शेटे
५. माजी नगरसेवक श्री. गणेश पवार
६. 'महाराष्ट्र राज्य प्रतापगड उत्सव समिती'चे उपाध्यक्ष श्री. विनायक काका सणस
७. एफर्ट टेक्निकल इन्स्टिट्यूट, शिरवळचे संस्थापक प्राचार्य विनोद भोसले
८. पत्रकार श्री. किरण अंबिके
सिंहगड रस्ता
'स्वा. सावरकर स्मृती प्रतिष्ठान'चे महामंत्री आणि पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर, डॉ. अशोक वाकोडकर, निवृत्त प्राचार्य आणि फॅमिली, तसेच कोर्टाचे समुपदेशक, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. प्रकाश गोरे
तळेगाव
अधिवक्ता समितीचे माजी सदस्य सौ. सुधा डिंबळे, तसेच 'मावळ तालुका वारकरी संघटने'चे अध्यक्ष ह.भ.प. श्री नवनाथ भसे महाराज यांची उपस्थिती होती.
सातारा रस्ता
भाजपच्या नगरसेविका सौ. तेजश्री बदक यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
कोथरूड
'महाराष्ट्र मंदिर महासंघाचे' श्री दिनेश माझीरे, सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. विजय माझीरे, उद्योजक श्री. अजित बाफना आणि श्री. रोहन बाफना, 'अपेक्षा' मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे अणि भाजपचे माजी नगरसेवक श्री. जयंत भावे यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
जुन्नर
१. 'वल्लभ नागरी बँके'च्या अध्यक्षा सौ. उज्वला शेवाळे
२. जुन्नर नगरसेविका अनुजा पातुरकर
३. भाजप नगरसेवक श्री. अनिल रोकडे
४. श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रमुख सौ. प्रतिभा मेहेर
५. खैरे हॉस्पिटल नारायणगावचे डॉ. लहू पोपट खैरे-
६. शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. मधुकर पांडूरंग काजळे
७. शरदचंद्र पवार गटाच्या माजी नगराध्यक्षा आणि सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. भारती मेहेर
चिंचवड
१. उपस्थित सर्वजण रामनामाच्या जपात तल्लीन झाले होते.
२. दैनिक 'सनातन प्रभात'च्या वितरणाची सेवा विनामूल्य करणार्या वितरक साधक, जिज्ञासू यांचा या वेळी श्री. सर्वेश मेहेंदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सिंहगड रस्ता
गुरुपौर्णिमास्थळी चैतन्यदायी असे वातावरण होते. या वेळी ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भोर
१. पाऊस आणि शेतीची कामे चालू असतांनाही भोर, शिरवळ, आळंदे, आळंदेवाडी, केंजळ, निळकंठ, हातवे, गवडी, शिंद येथील धर्मप्रेमी आणि जिज्ञासू उपस्थित होते.
२. रामबाग सभागृहाचे मालक श्री. प्रसाद पवार यांनी सांगितले की, सनातनचे साधक पूर्ण सभागृह अगदी कोपरा न् कोपरा स्वच्छ करून देतात, ते काम सेवा म्हणून करतात हे विशेष आहे, असे सांगितले.
३. भोर येथील नगरसेवक महोत्सवाला आल्यानंतर पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित राहिले आणि 'कार्य पुष्कळ छान असून याचा अजून प्रसार व्हायला हवा', असे सांगितले.
जुन्नर
१. धर्मप्रेमी, जिज्ञासू पेठवरून (ता. आंबेगाव) गाडी करून आले होते.
२. एक वयोवृद्ध स्त्री आणि एक स्त्री अपंग असूनही जिने चढून वर सभागृहात भाषण ऐकण्यासाठी आल्या.
३. गुरुपौर्णिमास्थळी वातावरणात चैतन्य जाणवत होते.
४. ग्रंथप्रदर्शनाला, उत्पादने आणि नियतकालिके कक्षाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
५. आरती चालू असतांना आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे चलचित्र पहातांना उपस्थितांची भावजागृती झाली.
६. स्वसंरक्षण प्रात्यक्षिके पहातांना उपस्थितांनी उत्स्फूर्त घोषणा दिल्या.
सिंहगड रस्ता
श्री. गणेश कुलकर्णी यांनी सभागृह उपलब्ध करुन दिले, तर भोजन व्यवस्थेसाठी श्री. सारंग राडकर यांनी सहकार्य केले.
भोर
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी 'रामबाग सभागृहा'चे मालक श्री. प्रसाद पवार, उद्योजक श्री. स्वप्नील शेटे, श्री. अनिकेत तुपे, श्री. धीरज गुजर, श्री. बाजीराव शिंदे, श्री. संदेश कोंढाळकर, मोहरी गावाचे माजी सरपंच श्री. सागर पांगारकर, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. गौरव शेडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सातारा रस्ता
'विणकर सभागृहा'चे श्री. अजय ढगे यांनी कार्यालय उपलब्ध करून दिले. काळे मांडववाले, तसेच श्री. अभिजित चव्हाण यांनी कार्यक्रम पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले.
जुन्नर
१. 'तिळवण तेली समाज' ज्यांनी सभागृह कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले.
शरदचंद्र पवार गटाच्या माजी नगराध्यक्षा आणि सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. भारती मेहेर, आधुनिक वैद्या सौ. श्रद्धा भिडे, बजरंग दल सेवक श्री. अक्षय गायकर
२. ओंकार मेहेर यांनी विद्युत साहित्य उपलब्ध करून दिले.

