पुणे - श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)', पुणे यांच्या वतीने १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'पराक्रमदिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे.
या निमित्ताने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि अद्वितीय नेतृत्वगुण नव्या पिढीपर्यंत पोचावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
थोरल्या बाजीरावांची युद्धनीती, हिंदवी साम्राज्य विस्तार, अपराजित योद्धा, संघटन कौशल्य, स्वामीनिष्ठा, देहली मोहीम, बुंदेलखंडचे रक्षण आणि जगप्रसिद्ध पालखेड विजय असे स्पर्धेचे मुख्य विषय आहेत. स्पर्धेची नियमावली, संदर्भ पुस्तके आणि ऑनलाईन नोंदणीसाठी https://parakramdin.mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रवेशिका १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत स्वीकारल्या जातील. 'अमृत'चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि नागरिक यांनी या स्पर्धांमध्ये धर्मकर्तव्य अन् राष्ट्रकर्तव्य म्हणून उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गट : शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट
स्पर्धेचे प्रकार : निबंध (मराठी, हिंदी किंवा इंग्रजी), वक्तृत्व आणि रिल्स/शॉर्ट्स स्पर्धा

