Dailyhunt
पुण्यात ५० वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांमुळे अनर्थ टळला !

पुण्यात ५० वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांमुळे अनर्थ टळला !

पुणे - पर्वती परिसरात एका ५० वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला. वेळीच नागरिकांनी प्रसंग ओळखून हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

आरोपी पीडित मुलीचा नातेवाईक असल्याची आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पीडितेला उपचारांसाठी ससूनमध्ये नेण्यात आले आहे.

५० वर्षांच्या व्यक्तीने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. हा प्रकार नागरिकांनी पाहिल्याने अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सुटका झाली. 'आरोपीला आमच्या कह्यात द्या', अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi