योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी संस्कारित केलेली सूर्यदेवाच्या चेहर्याची प्रतिमा जुलै २०१४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवण्यात आली. सनातनच्या एक महिला संतांनी या प्रतिमेचे छायाचित्र पाहून ५.७.२०२६ या दिवशी केलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

सनातनचे काही सद्गुरु, संत आणि साधक सूक्ष्मातील ज्ञान मिळवतात. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण हे साधकाची पातळी, काळ, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. साधक, संत आणि सद्गुरु या क्रमानुसार त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे साधक, संत आणि सद्गुरु यांनी शोधून काढलेल्या एखाद्या सूक्ष्मातील स्पंदनांच्या टक्केवारीत भेद असू शकतो.
१ अ १. संकल्परूपी तारक शक्ती प्रतिमेतील सूर्यदेवाच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत असणे : सूर्यदेवाच्या चेहर्याच्या या प्रतिमेवर उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या एका संतांनी विधीवत संस्कार करून ती उपायांसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दिली. 'सूर्यदेवाच्या चेहर्याच्या या प्रतिमेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरांवर लाभ व्हावा', हा या मागचा हेतू (संकल्प) असल्याने या प्रतिमेत संकल्परूपी तारक शक्ती निर्माण झाली आहे.
१ आ. सूर्यदेवाचे तत्त्व
१ आ १. सूर्यदेवाच्या तत्त्वाचे वलय प्रतिमेत कार्यरत असणे : या प्रतिमेत सूर्यदेवाचे अस्तित्व असल्यामुळे सूर्यदेवाचे तत्त्व या प्रतिमेत कार्यरत झाले आहे.
१ आ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, तसेच वातावरणातील त्रासदायक शक्ती न्यून व्हाव्यात, यांसाठी सूर्यदेवाच्या तत्त्वाचा प्रवाह प्रतिमेतून वातावरणात प्रक्षेपित होत असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होणे, तसेच वातावरणातील त्रासदायक शक्ती न्यून होणे, यांसाठी सूर्यदेवाच्या तत्त्वाचा प्रवाह प्रतिमेतून वातावरणात प्रक्षेपित होत आहे. सूर्यदेवाच्या तत्त्वामुळे वातावरणातील त्रासदायक शक्ती जळून जातात.
१ इ. चैतन्य
१ इ १. चैतन्याचे वलय सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत कार्यरत असणे
१ इ २. चैतन्याचे वलय व्यापक स्वरूपात सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेतून वातावरणात प्रक्षेपित होत असणे
१ ई. आनंद
१ ई १. आनंदाचे वलय सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेच्या भोवती कार्यरत असणे : सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत सजीवता आली आहे. प्रतिमेतील डोळेही इतके सजीव झाले आहेत की, 'सूर्यदेव प्रत्यक्ष आपल्याकडे पहात आहे', असे जाणवते, तसेच त्याच्या डोळ्यांत आनंद जाणवतो. जेव्हा सूर्यदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे पहात असतो, तेव्हा त्याच्या चेहर्यावर आनंद उमटतो.

२ अ. सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेतील निर्गुण तत्त्व : सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत ६० टक्के निर्गुण तत्त्व आहे. जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले निर्गुण स्थितीत असतात, तेव्हा काळानुरूप सूर्यदेवाच्या चेहर्याची प्रतिमाही निर्गुण स्थितीत असते. अशा वेळी सूर्यदेव शांत स्थितीत गुरुदेवांच्या खोलीत सूक्ष्मातून असतो.
२ आ. सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेतील सगुण तत्त्व : सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत ४० टक्के सगुण तत्त्व आहे. ज्या ज्या वेळी काळानुरूप गुरुदेवांचे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास, तसेच वातावरणातील त्रासदायक शक्ती न्यून होणे आवश्यक असते, तेव्हा काळानुरूप सूर्यदेवाच्या चेहर्याची प्रतिमा सगुण स्थितीत असते.
अ. मी सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेकडे पहात असतांना 'त्या प्रतिमेतून उष्णता बाहेर येत आहे', असे मला जाणवले.
आ. सूर्यदेवाच्या चेहर्याची प्रतिमा इतकी सजीव झाली आहे की, 'सूर्यदेव सूक्ष्मातून उपस्थित आहे', असे मला जाणवले आणि माझी भावजागृती झाली.'
- सनातनच्या एक महिला संत, विदेश (५.७.२०२६)
'सूर्यदेवतेच्या चेहर्याची प्रतिमा आश्रमात येऊन केवळ १२ वर्षे झाली आहेत. इतक्या अल्पावधीत तिच्यामध्ये अधिक प्रमाणात पालट झाले आहेत. साधकांनो, आश्रमात आल्यावर धातूच्या मूर्तीमध्ये इतक्या प्रमाणात पालट झाले आहेत, तर मग साधकांचीही आध्यात्मिक प्रगती होणारच आहे !'
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१९.७.२०२६)
'या लेखमालेच्या माध्यमातून प्रकाशित केले जाणारे देवतांच्या मूर्तींमध्ये होणारे दैवी पालट हे आध्यात्मिक स्तरावरील आहेत. साधना करून सत्त्वगुण एका टप्प्यापर्यंत वाढला की, हे दैवी पालट अनुभवता येतात. त्यामुळे 'ज्यांना या लेखात प्रकाशित करण्यात आलेल्या छायाचित्रांमधील दैवी पालट लक्षात येत नसतील, त्यांनी त्यांची साधना आणखी वाढवणे आवश्यक आहे', हे त्यांनी लक्षात घ्यावे !'
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२५.७.२०२६)
'देवतांच्या मूर्तींमध्ये सजीवता येऊन त्यांची हालचाल जाणवणे, ही सूक्ष्मातील प्रक्रिया आहे. हे साध्य होण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी भक्ताची तशी साधना असणे आवश्यक असते. सध्याच्या काळात बहुतांश जण मोह-मायेत अडकलेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये सत्त्वगुण अल्प आहे. त्यामुळे फार थोड्या जणांनाच हे सूक्ष्मातील अनुभवता येते; परंतु पुढील काळात येणार्या हिंदु राष्ट्रात सर्व जण साधना करणारे असल्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या अनुभूती नियमित येतील.'
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.७.२०२६)

