'सागर, रत्नाकर (म्हणजे रत्नांची खाण), अपाननिधी (जलाचा साठा), अबुंधी (म्हणजे पाण्याचा धारक), सिंधु (अथांग जलाशय) ही समुद्रदेवाची विविध नावे प्रचलित आहेत.
व्यापक, अनेक नद्यांचा समावेशक, मर्यादेचे पालन करणारा, विविध रत्नांचा धारक आणि शुद्धता हे समुद्राचे विविध गुण आहेत.
ब्रह्मांडात प्रमुख ७ प्रकारचे समुद्र आहेत - लवण समुद्र, इक्षुरस समुद्र, सुरा समुद्र, घृत समुद्र, दधि समुद्र, क्षीर समुद्र आणि स्वादुजल समुद्र. या समुद्रांतील द्रव्ये निरनिराळी आहेत, तसेच हे सप्तसमुद्र सप्तद्विपांशी निगडित आहेत.
४ अ. मत्स्यलोक : या उपलोकात विविध प्रकारचे मासे असतात. यांत सोनेरी आणि चंदेरी या रंगांचे मासे विशेष असतात; कारण ते एकमेकांशी गाऊन संभाषण साधतात.
४ आ. शंखलोक : शंख लोकात विविध प्रकारचे शंख आहेत. या लोकात 'देवदत्त, नंदिघोष, स्वरगंधर्व, नागनाद' इत्यादी शंखांचा समावेश आहे. येथील शंख हे पांढर्या शुभ्र रंगाचे असून त्यांच्याभोवती सोनेरी किंवा चंदेरी या रंगाची चमकणारी किनार असते, तसेच त्यांचा आकारही अत्यंत सुंदर असतो. त्यांचा नाद अत्यंत मंजुळ आणि उत्साहवर्धक असतो.
४ इ. शिंपले आणि मोती यांचा लोक : या लोकामध्ये विविध प्रकारचे चंदेरी आणि सोनेरी या रंगांचे शिंपले चमकतांना दिसतात. त्यांच्या आत पांढर्या शुभ्र रंगाचे गोल मोती असतात. या मोत्यांच्या भोवती सोनरी किंवा चंदेरी या रंगाची आभा असते.
४ ई. पाताळातील नागलोकाचा मार्ग समुद्रातून जाणे : समुद्राच्या तळाशी जेथे सूर्यप्रकाश पोचत नाही, तेथे संपूर्ण अंधार असतो. तेथून पाताळातील आसुरी नागलोकाचा मार्ग जातो. समुद्राच्या एका भागात जेथे पुष्कळ प्रकाश असतो, तेथून शिवलोकाच्या जवळ असणार्या दैवी नागांच्या लोकाकडे सूक्ष्म मार्ग जातो. अशाप्रकारे समुद्रलोकामध्ये दैवी आणि आसुरी नागलोकांकडे जाणारे दोन मार्ग असतात. या मार्गातून काही नाग समुद्रलोकात ये-जा करतात.
सत्ययुगात देवासुरांनी क्षीरसागराचे मंथन करून १४ रत्ने प्राप्त केली. 'हलाहल विष, कामधेनू, उच्चैःश्रवा अश्व, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, ५ अप्सरांचा समूह ('रंभा, मेनका, तिलोत्तमा, रक्षिता आणि ऋतुवर्णा' या अप्सरा), वारुणी मदिरा (दारू), पारिजात वृक्ष, शारंग धनुष्य, पाञ्चजन्य शंख, चंद्रदेव, सिंधुसुजाता कल्याणी महालक्ष्मी आणि धन्वंतरीदेवाने घेतलेला अमृतकलश' ही समुद्रमंथनातून प्राप्त झालेली १४ रत्ने (निरनिराळ्या पुराणांमध्ये या १४ रत्नांचा क्रम निराळा आहे) होत. त्यामुळे समुद्राला 'रत्नाकर' हे नाव प्राप्त झाले.

७ अ. विविध प्रकारची उपासना करणे : प्राचीन काळापासून अनेक ऋषीमुनी समुद्रस्नान करून समुद्राच्या पाण्यात उभे राहून जलानुष्ठान किंवा जलसाधना करायचे, तसेच काही ऋषीमुनी समुद्रकिनारी बसून तपसाधनाही करतात. काही भाविक समुद्रकिनारी बसून वाळूचे शिवलिंग बनवून किंवा देवतांच्या प्रतिमांचे पूजन करतात.
७ आ. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राचे पूजन करणे : पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे या समुद्राला शांत करण्यासाठी श्रावण मासातील पौर्णिमेला समुद्रात नारळ आणि फुले अर्पण करून समुद्राचे पूजन केले जाते. त्यामुळे समुद्रदेव संतुष्ट होऊन शांत होतो.
'श्री गुरुकृपेने समुद्रदेवाविषयीचे हे गूढ ज्ञान प्राप्त झाले', त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. 'समुद्रदेवाप्रमाणेच आम्हा साधकांमध्ये व्यापकत्व येऊ दे आणि आम्हाला मर्यादेचे पालन करून धर्माचरण करण्याची प्रेरणा मिळू दे', ही श्री गुरुचरणी विनम्र प्रार्थना आहे.'
- सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखनाचा दिनांक : १४.८.२०२६, वेळ : सकाळी ८ ते ८.४० अन् एकूण कालावधी : ४० मिनिटे)

