Sunday, 24 Jan, 12.32 am सनातन प्रभात मराठी

होम पेज
सनदशीर मार्गांनी केलेल्या प्रयत्नांना ईश्वरी साहाय्य मिळते ! - सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समिती आयोजित धर्मप्रेमींची विदर्भस्तरीय बैठक उत्साहात पार पडली

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट

अमरावती, २३ जानेवारी (वार्ता.) - हिंदु राष्ट्र स्थापनेत आपला वाटा खारीचा कि सिंहाचा याचा विचारपूर्वक निर्णय घेऊया. १९ मासांत १३० मूर्तींची तोडफोड झाली. मंदिरांची ७० कोटी रुपयांची मालमत्ता चोरी झाली. यावरसुद्धा आंध्र प्रदेश राज्यात कुठलीही कारवाई होत नाही. यासाठी हिंदु धर्मप्रेमींनी जागृत होऊन सनदशीर मार्गांनी प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यासच ईश्वरी साहाय्य मिळते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या धर्मप्रेमींच्या विदर्भस्तरीय ऑनलाईन बैठकीचा आरंभ १७ जानेवारी या दिवशी करण्यात आला. त्यात ते बोलत होते. धर्मप्रेमींना सनदशीर मार्गाने धर्मकार्य करता यावे, यासाठी माहिती आणि प्रेरणा मिळावी, हा बैठकीचा उद्देश हिंदु जनजागृती समिती अमरावतीचे समिती समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी सांगितला.

बैठकीत धर्मकार्य करतांना येणारे चांगले-वाईट अनुभव सर्वश्री गोपाल चापके, मोहन लेहगावकर, अनिरुद्ध साळुंके, संतोष अवचार यांनी सांगितले. या बैठकीचा लाभ ५५ धर्मप्रेमींनी घेतला. सूत्रसंचालन कु. शबरी देशमुख यांनी केले. धर्मप्रेमींना मार्गदर्शन मिळण्यासाठी पुढील ऑनलाईन बैठक २४ जानेवारी २०२१ या दिवशी आयोजित केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi
Top