मुंबई - 'फलज्योतिष अभ्यास मंडळ, पुणे' यांच्या वतीने ज्योतिष विषयांच्या विविध पदवी परीक्षांचे आयोजन केले जाते. यांपैकी 'ज्योतिष प्राज्ञ' ही पदवी परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेमध्ये सनातनचे साधक श्री. श्रेयस पिसोळकर हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना २०० पैकी १७८ गुण प्राप्त झाले आहेत. या वेळी फलज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि संचालक पंडित विजय श्रीकृष्ण जकातदार यांनी भ्रमणभाष करून त्यांचे अभिनंदन केले. या वेळी पंडित जकातदार यांनी 'यापुढेही असाच अभ्यास चालू ठेवा. तुम्ही आमच्या कुटुंबातीलच आहात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !', असे सांगितले.
'केवळ गुरुकृपेने हे साध्य होऊ शकले. हे यश मी श्रीगुरुचरणी अर्पण करतो. श्रीगुरुंच्या सेवेसाठीच या ज्ञानाचा उपयोग करीन', असे मनोगत श्री. श्रेयस यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

