Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध ! - संतोष पाटील, जिल्हाधिकारी

सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध ! - संतोष पाटील, जिल्हाधिकारी

सातारा, २९ मे (वार्ता.) - आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस (एल्.पी.जी.), पेट्रोल आणि डिझेल वितरण विस्कळीत होण्याच्या शक्यतेने जिल्ह्यात काही ठिकाणी इंधन टंचाईच्या अफवा पसरत आहेत; मात्र सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि विविध इंधन आस्थापनांचे (आय.ओ.सी.एल्., बी.पी.सी.एल्., एच्.पी.सी.एल्. यांचे) विक्री अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आढावा देतांना जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाल्या की, इंधन पुरवठा करणार्‍या आस्थापनांकडून मागणीनुसार प्रतिदिन पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. इंधन पुरवठा करणारे तीनही इंधन आगार सातारा जिल्ह्याजवळ असल्याने पुरवठ्यात कोणताही खंड पडणार नाही.

बैठकीत आढावा देतांना जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाल्या, ''सातारा जिल्ह्यात एकूण ३३८ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. जिल्ह्याला हवेली (पुणे), मिरज (सांगली) आणि पाकणी (सोलापूर) या ३ वेगवेगळ्या इंधन (डेपो) आगारातून नियमित इंधन पुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी प्रतिदिन ६०० किलोलिटर पेट्रोल आणि १ सहस्र किलोलिटर डिझेलची (१ किलोलिटर म्हणजे १ सहस्र लिटर) विक्री होते. सध्या सातारा जिल्ह्यात पेट्रोलचा २ सहस्र ७७६ किलोलिटर आणि डीझेलचा ३ सहस्र ६७१ किलोलिटर एवढा पुरेसा साठा उपलब्ध आहे.''

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi