Friday, 30 Oct, 12.31 am सनातन प्रभात मराठी

होम पेज
शिक्षा भोगलेल्या भारतियांना परत पाठवा ! - इस्लामाबाद न्यायालयाचा पाक सरकारला आदेश

इस्लामाबाद (पाकिस्तान) - आतंकवाद आणि हेरगिरी या प्रकरणांत शिक्षा पूर्ण केल्यानंतरही कारागृहात ठेवण्यात आलेल्यांना काही भारतियांना परत भारतात पाठवण्यात यावे, असा आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाक सरकारला दिला.

८ भारतीय नागरिकांनी सुटकेसाठी केलेल्या याचिकांची सुनावणी करताना अंतर्गत मंत्रालयाच्या प्रतिनिधीने इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनाल्ला यांना अहवाल सादर केला होता. त्यात ५ भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे पाकिस्तान सरकारने २६ ऑक्टोबरला त्यांची सुटका केली आणि त्यांना मायदेशी परत पाठवले, अशी माहिती पाकचे सब अ‍ॅटर्नी जनरल सैयद महंमद तय्यब शाह यांनी न्यायालयाला दिली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi
Top