'सनातन संस्थेचे साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या 'गुरुकृपायोग' या साधनामार्गानुसार साधना करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुरुरूपी ईश्वरी कृपेचा अखंड वर्षाव होत आहे.
या गुरुकृपेचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.
भगवंताचे सगुण आणि साकार रूप म्हणजे 'गुरु !' साधकांना निर्गुण ईश्वरापर्यंत पोचणे कठीण असते; मात्र साधकांना ईश्वराचे सगुण रूप असलेल्या देहधारी श्री गुरूंपर्यंत पोचून त्यांची कृपा संपादन करणे सुलभ आहे. त्यामुळे सनातन संस्थेचे संस्थापक आणि मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी 'सर्व साधकांना गुरुकृपेचा अधिकाधिक लाभ व्हावा', यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग इत्यादी साधनामार्गांचा संगम असलेल्या 'गुरुकृपायोग' या साधनामार्गाची निर्मिती केली आहे. जेव्हा साधक भक्तीभावाने गुरुकृपायोगानुसार साधना करतात, तेव्हा त्यांच्या दिशेने श्री गुरुकृपेतून तारक शक्ती प्रक्षेपित होते. त्यामुळे साधकांच्या भोवती गुरुकृपेचे दिव्य संरक्षककवच निर्माण झाले आहे. त्यामुळे साधकांना पुढील लाभ होत आहेत.
१ अ. साधकांच्या भोवती गुरुकृपेचे दिव्य संरक्षककवच निर्माण झाल्यामुळे साधकांना झालेले विविध प्रकारचे लाभ, त्यांचे प्रमाण आणि त्यामुळे साधकांवर होणारे परिणाम !

एखादा साधक भावपूर्णरित्या आणि तळमळीने साधना करत असतांना जर अतृप्त पितर किंवा वाईट शक्ती त्याला त्रास देत असतील, तर त्या साधकाच्या दिशेने गुरुकृपेतून मारक शक्ती प्रक्षेपित होते. त्यामुळे साधकाच्या भोवती गुरुकृपेचे संरक्षककवच निर्माण होते. या संरक्षककवचातून अतृप्त पितर किंवा वाईट शक्ती यांच्याकडे कृपा-अस्त्राचे प्रक्षेपण होते. त्याचप्रमाणे कुणी व्यक्ती जर साधकाच्या साधनेला तीव्र विरोध करत असेल, तर तिच्या दिशेनेही हे कृपा-अस्त्र प्रक्षेपित होऊन त्या व्यक्तीला गुरु उग्ररूप धारण करून कठोर शिक्षा देतात. त्यामुळे या कृपाअस्त्राला 'गुरुकृपा-अस्त्र', असे म्हणतात.
२ अ. साधकांच्या साधनेत अडथळे निर्माण करणार्या घटकांकडे गुरुकृपेचे अस्त्र प्रक्षेपित होण्याचे प्रमाण आणि त्यामुळे साधकांवर झालेले परिणाम

टीप : 'साधकांच्या साधनेमुळे त्यांना इंद्रपद किंवा दैवी सिद्धी मिळून आपले महत्त्व न्यून होईल', या भीतीपोटी अतिमानवी योनीतील शक्ती काही वेळा साधकांच्या साधनेत अडथळे निर्माण करतात. त्यांचे निराकरण केवळ गुरुच करू शकतात.

टीप : अन्य युगांत साधनेला इतका विरोध नव्हता. त्यामुळे 'सत्य, त्रेता आणि द्वापर' या युगांत श्री गुरूंचे तारक रूप अधिक काळासाठी कार्यरत झाले होते आणि क्वचित प्रसंगी त्यांचे मारक रूप कार्यरत होत असे; मात्र कलियुगात साधकांना स्थूल आणि सूक्ष्म या माध्यमांतून प्रचंड प्रमाणात विरोधाला सामोरे जावे लागते. त्यामुळे कलियुगात गुरूंचे मारक रूप अधिक काळासाठी कार्यरत झाले आहे आणि क्वचित प्रसंगी त्यांचे तारक रूप कार्यरत होत आहे.
आता गुरुमाऊलींच्या चरणी आमुची एकच प्रार्थना आहे.
'गुरुध्यानी आम्हा चैतन्य मिळो । अहंकार तो आमुचा समूळ गळो'।
- सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखनाचा दिनांक : २.७.२०२६, वेळ : दुपारी १.१० ते १.४० अन् एकूण कालावधी : ३० मिनिटे)

