Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सीलबंद पाकिटात 'एंडोस्कोपी कॅमेरा' टाकून प्रश्नपत्रिका फोडली !

सीलबंद पाकिटात 'एंडोस्कोपी कॅमेरा' टाकून प्रश्नपत्रिका फोडली !

(एंडोस्कोपी कॅमेरा हा साधारण १० मिलिमीटर व्यासाचा असतो. त्याद्वारे मनुष्याच्या शरिरातील स्थिती कोणतीही शस्त्रक्रिया न करता पहाता येते.)

रायपूर (छत्तीसगड) - राज्यातील दुर्ग येथे एका प्राध्यापकाने 'एंडोस्कोपी कॅमेर्‍या'ने प्रश्नपत्रिका फोडून ती विद्यार्थ्यांना प्रत्येकी ११ सहस्र रुपयांना विकली.

प्रश्नपत्रिका सीलबंद पाकिटात होती. प्राध्यापकाने त्यात सुईने भोक पाडले. त्यात 'एंडोस्कोपी कॅमेरा' घालून प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ बनवला. या प्रकरणी पोलिसांनी प्राध्यापकासह ६ जणांना अटक केली आहे. प्राध्यापकाचे नाव योगेश सोनकेसरिया असून तो दुर्ग जिल्ह्यातील भारती कृषी महाविद्यालयात वर्ष २०१९ पासून प्राध्यापक आहे.

इंदिरा गांधी कृषी विद्यापिठाच्या बी.एस्सी. (कृषी) द्वितीय वर्षाच्या दुसर्‍या सत्रातील 'कीटकशास्त्र' विषयाची ही प्रश्नपत्रिका होती. आता ही परीक्षा विद्यापिठाशी संलग्न असलेल्या २८ कृषी महाविद्यालयांमध्ये पुढे ढकलण्यात आली आहे.

प्रा. योगेश गेल्या साधारण वर्षभरापासून महाविद्यालयाच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी, तसेच आगामी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका घेण्यासाठी रायपूर कृषी महाविद्यालयात येत होता. १७ ऑगस्टला तो उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी महाविद्यालयात आला होता. याच वेळी त्याने आगामी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका घेतल्या. त्याने कीटकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांचे पाकीट घरी नेले. त्यात छिद्र करून 'एंडोस्कोपी कॅमेरा' टाकून प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ बनवला. २० ऑगस्टला परीक्षेच्या २ घंटे आधी त्यातील प्रश्न व्हॉट्सॲपवर आल्याचे समोर आल्यानंतर चौकशी केली असता प्रा. योगेशने केलेले कृत्य समोर आले. त्यामुळे ऐनवेळी परीक्षा रहित करण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi