सावंतवाडी - येथे बजरंग दलाचे श्री. कृष्णा धुळपणावार, बांदा येथील काजू उद्योजक डॉ. नितीन माळवणकर, नगरसेविका सौ. रूपाली भालेकर, गोवा मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, पतंजलि योग समितीच्या दोडामार्ग येथील सौ.
नर्मदा पटेल आदी उपस्थित होते.
कणकवली - येथे नगराध्यक्ष संदेश पारकर, जानवली गावचे उपसरपंच किशोर राणे, आयनल गावच्या सरपंच सौ. सिद्धी दहिबांवकर आदी उपस्थित होते.
मालवण - येथे भाजपच्या नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर, शिवसेनेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष आणि अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर, माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर, भाजपचे नगरसेवक मंदार केणी, अधिवक्ता गिरीश गिरकर, अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर, अधिवक्ता समीर गवाणकर, अधिवक्ता ऐश्वर्य मांजरेकर, डॉ. अविनाश झांटये, सौ. शिल्पा झांटये, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक तपस्वी मयेकर आदी उपस्थित होते.
देवगड - येथे नगरसेवक विशाल मांजरेकर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, माजी नगरसेवक संजय तारकर, प्रशांत हडकर (हॉटेल अलंकार), राजन कोळंबकर (हॉटेल वसंत विजय), सामाजिक कार्यकर्ते यदुनाथ ठाकूर देसाई, पत्रकार संतोष कुळकर्णी, डॉ. पुष्कर आपटे, हिंदळे सरपंच मकरंद शिंदे, आरे सरपंच सौ. ममता सतीश कदम, कुवळे येथील श्री रामेश्वर देवस्थानचे विश्वस्त मिथुन लाड, इळये येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे प्रमुख विश्वस्त आणि माजी सरपंच विश्राम अंकुश कदम, खुडी येथील श्री हेदुबाई मंदिराचे मानकरी सुदामा घाडीगांवकर, भिवा घाडीगांवकर आणि मंदिर समितीचे सचिव शशिकांत कावले, शिरगाव येथील श्री पावणाई मंदिराचे मानकरी विजय तावडे, श्री कुणकेश्वर मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ तेली आदी उपस्थित होते.
कुडाळ - भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, भाजपचे मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
वेंगुर्ला - भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उपाख्य बाळू देसाई, आरवली येथील श्री वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत उपाख्य बाळा राय, तुळस येथील 'उत्सव हॉल'चे मालक आनंद तांडेल, वायंगणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवींद्र धोंड आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे उपस्थित जिज्ञासूंना जागृत करणारे उद्बोधक मार्गदर्शन !
स्वसंरक्षणासाठी हिंदूंनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम व्हावे ! - माजी सैनिक प्रमोद नाईक
सावंतवाडी - सध्याच्या परिस्थितीत केवळ पोलीस यंत्रणेवर संरक्षणासाठी अवलंबून न रहाता प्रत्येक हिंदूने स्वतःचे आणि स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करण्याइतपत सक्षम होणे आवश्यक आहे. देशातील पोलीसदलाची मर्यादित संख्या आणि उपलब्ध मनुष्यबळ पहाता प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचे संपूर्ण दायित्व पोलीस यंत्रणा एकटी पार पाडू शकत नाही. नियमित योगासन, प्राणायाम, व्यायाम तसेच कराटे, ज्युडो, लाठी-काठी यांसारख्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा महिलांसह सर्वांनी लाभ घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाणे, रुग्णवाहिका, अग्नीशमन दल, लोकप्रतिनिधी आदींचे संपर्क क्रमांक स्वत:जवळ ठेवावेत, तसेच प्रथमोपचार, वाहन चालवणे, पोहणे, स्वयंपाक यांसारखी जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करावीत. शारीरिकसह मानसिक आणि बौद्धिक सामर्थ्यही तितकेच आवश्यक आहे. धर्मग्रंथांचा अभ्यास, चिंतन-मनन, धर्माचरण केले पाहिजे आणि साधनेद्वारे मन स्थिर ठेवले पाहिजे.
भगवंत आणि श्री गुरु यांना जे स्वत्व अर्पण करतात, तेच जीवनात यशस्वी होतात ! - वेदमूर्ती भूषण जोशी
कुडाळ - प्रभु श्रीराम सोबत आहे, तेथे यश आहे. ज्याच्या पाठीशी राम आहे, ती सर्वसामान्य व्यक्तीही यशस्वी होते. श्रीरामासह अनेक पराक्रमी वीर असतांना श्रीरामाने वानरसेनेला सोबत घेऊन युद्ध जिंकले. हे रामराज्याचे मुख्य सूत्र आहे. रामराज्य येण्यासाठी स्वतःपासून प्रारंभ करावा. गुरु-शिष्य परंपरेत महर्षि व्यासांचे कार्य अद्वितीय आहे. सर्व विषयांना स्पर्श करून ज्ञान देण्याचे कार्य त्यांनी केले. श्री गुरुच आपल्याला उत्कर्षाचा संदेश देतात. जीवनात सर्वदृष्टीने प्रगतीसाठी दृढ विश्वास देतात. साधनामय जीवनात अहं-निर्मूलनही महत्त्वाचे आहे. अहं-निर्मूलन म्हणजे मीपणाचे निर्मूलन करणे. गुरूंकडे आपण स्वत्व अर्पण केले पाहिजे. श्री गुरु आणि भगवंत यांच्याकडे जे स्वत्व अर्पण करतात तेच जीवनात यशस्वी होतात. अवतारी पुरुष राम आणि कृष्ण यांनी त्यांच्या गुरूंना सर्वस्व अर्पण केले. त्यामुळे आपणही गुरूंनी सांगितलेली साधना करावी. सत्य बोलण्याचे सामर्थ्यही गुरुकृपेनेच येते.
धर्म दुर्बल झाला की, राष्ट्र दुर्बल होते ! - डॉ. मुकुल प्रभुदेसाई, विश्वस्त, इनामदार श्री भगवतीदेवी संस्थान, कोटकामते
देवगड - राष्ट्र म्हणजे सुयोग्य व्यवस्था, संघटितपणे रहाणारा समाज, समान संस्कृती, इतिहास, परंपरा आणि मूल्ये आहेत, या विविधतेने पण एकात्मतेने जोडलेला समाज होय. 'जो धारण करतो तो धर्म' म्हणजे खरे बोलणे, आई-वडिलांचे सेवा करणे, परोपकार करणे हा धर्माचाच भाग आहे. भारतीय संस्कृतीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत आणि यांचा पाया धर्म आहे. काय करावे आणि काय करू नये, हे सांगतो तो धर्म होय. धर्माधिष्ठित राहून अर्थार्जन करणे, आरोग्य राखण्यासाठी दिनचर्येचे पालन, हा सुद्धा धर्मच आहे. धर्म दुर्बल झाला की, राष्ट्र दुर्बल होते. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. धर्मामध्ये सर्वांच्या कल्याणाची भावना आहे. राष्ट्र म्हटले की, प्रथम सैनिकांचे स्मरण, प्रामाणिकपणे कर भरणे, स्वच्छता ठेवणे, पर्यावरणाचे रक्षण, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, म्हणजेच राष्ट्राप्रती जी कर्तव्ये आहेत, त्यांचे पालन करणे म्हणजे राष्ट्रधर्म होय. धर्मरक्षणासाठी स्वत:च्या धर्माचा अभिमान बाळगून तशी कृती करणे आवश्यक आहे.
हिंदूंनी एकजुटीने उभे रहाणे, ही काळाची आवश्यकता ! - प्रा. सचिन परुळकर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला
वेंगुर्ला - आज देश आणि धर्म यांवर वारंवार वेगवेगळ्या माध्यमांतून आघात होत आहेत. हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने अल्प होत आहे. घुसखोरांनी देश पोखरला आहे. 'जेन झी'ला (वर्ष १९९६ ते २०१० या काळात जन्मलेल्या युवापिढीला) भडकवून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. जातीपातीमध्ये हिंदूंना विभाजित करण्याचे आणि त्यांना एकमेकांमध्ये लढवण्याचे प्रयत्न होत आहेत. 'झुरळ' या शब्दाचा विपर्यास करून २ महिन्यांपूर्वी 'कॉकरोच जनता पार्टी' निर्माण झाली आणि तिच्या आंदोलनाला देशभर प्रसिद्धी मिळाली; कारण भारतात विरोधकांची एक 'इकोसिस्टिम' (एखादी विचारसरणी पद्धतशीरपणे पुढे रेटणारी यंत्रणा) आहे. भारताला 'दारुल इस्लाम' (ज्या देशात मुसलमानांचे शासन आणि शरिया कायदा सर्वांना लागू होतो, त्याला 'दारुल इस्लाम' (इस्लामस्थान) म्हणतात.) बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होत आहेत. या सर्वांवर उपाय म्हणून हिंदूंनी एकजुटीने उभे रहाणे काळाची आवश्यकता आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या विशेष सभेत गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा एकमुखी ठराव घेऊन ते उपलब्ध करून दिल्याविषयी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, सर्व नगरसेवक आणि नगरपरिषदेचे कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले. यासह जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुचरणांची सेवा म्हणून ध्वनीवर्धक यंत्रणा, सभागृह, साधकांसाठी न्याहारी आणि महाप्रसाद, गुरुपौर्णिमा स्थळी येण्यासाठी वाहने उपलब्ध करून देणे आदी वेगवेगळ्या प्रकारे अनेकांनी साहाय्य केले, तसेच स्थानिक पोलीस प्रशासनानेही सहकार्य केले, यासाठी सर्वांचे आभार या वेळी मानण्यात आले.

