सोलापूर - हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले. समितीच्या शाखा, धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग यांमध्ये शस्त्रपूजन करण्यात आले.
या उपक्रमात रणरागिणी शाखेच्या महिला आणि युवती यांनीही सहभाग घेतला. प्रारंभी शस्त्रपूजनाचे महत्त्व सांगण्यात आले. त्यानंतर शस्त्रपूजन, श्री दुर्गादेवीची आरती आणि सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमात सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेकडो भाविक सहभागी झाले, अशी माहिती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी दिली.

