Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Spain Migrant Crisis : समुद्रमार्गे पोहत मोरोक्कोहून सहस्रो मुसलमान घुसखोर स्पेनमध्ये घुसले : ९ जण ठार

Spain Migrant Crisis : समुद्रमार्गे पोहत मोरोक्कोहून सहस्रो मुसलमान घुसखोर स्पेनमध्ये घुसले : ९ जण ठार

माद्रिद (स्पेन) - युरोपमधील स्पेन आणि मोरोक्को या देशांच्या सीमेलगत असलेल्या सेउटा या शहरात अचानक सहस्रो मुसलमान घुसखोरांनी समुद्रातून पोहत प्रवेश केला. यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सरकारने सैन्य तैनात केले.

घुसखोरांना परत पाठवण्याच्या प्रयत्नात ९ जण ठार झाले. इतक्या मोठ्या संख्येने घुसखोरांनी सेउटात प्रवेश का केला ?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Ceuta Border Crisis: Spain Deploys Military After Mass Crossing

🚨 Spain has deployed the military after thousands of Muslim migrants swam from Morocco into the Spanish enclave of Ceuta during a large-scale border crossing.

Reports also state that at least 9 people lost their… pic.twitter.com/KGOUBV3mEp

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

१. सेउटाच्या सीमेवर तैनात असलेल्या स्पेनच्या सिव्हिल गार्ड अधिकार्‍यांच्या संघटनेचे प्रमुख राचिद स्बिही यांनी सांगितले की, परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. घुसखोरांची नेमकी संख्या सांगणे शक्य नाही; पण सहस्रो घुसखोर सीमा ओलांडत आहेत. सीमा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

२. उत्तर मोरोक्कोमधील 'मोरोक्कन असोसिएशन फॉर ह्युमन राइट्स'चे सदस्य अचराफ माइमुनी यांनीही या परिस्थितीचे वर्णन 'अभूतपूर्व' असे केले. 'आज सकाळी असामान्य परिस्थितीमुळे ताराजाल सीमेवरील चौकी उघडण्यात आली आणि त्यानंतर लोकांनी सीमा ओलांडली', असे त्यांनी सांगितले.

. स्पेनच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, परिस्थिती हाताळण्यासाठी मोरोक्को सरकार स्पेनला सहकार्य करत आहे. तसेच सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना मोरोक्कोचे पोलीस अडवत आहेत. दोन्ही देशांनी सेउटामध्ये अवैधपणे प्रवेश केलेल्या सर्वांना शक्य तितक्या लवकर परत पाठवण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे,

४. या घटनेचे पडसाद इटलीतही उमटले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी 'आपल्या सीमा आणि नागरिकांची सुरक्षा यांसाठी स्पेनसमवेतचा खुल्या सीमांचा शेंगेन करार स्थगित करण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे इटलीची स्पेनशी थेट भूसीमा नाही.

५. उत्तर आफ्रिकेच्या किनार्‍यावर असलेल्या सेउटामध्ये पोचण्यासाठी स्थलांतरित अनेकदा मोरोक्कोतील फिनदेक या शहरातून समुद्रात पोहत निघतात. स्पेनच्या सीमेत पोचण्यासाठी त्यांना अनुमाने ५ किलोमीटर अंतर पार करावे लागते. काही जण जवळच्या बेल्युनेश या शहरातूनही घुसण्याचा प्रयत्न करतात. तेथून अंतर तुलनेने अल्प आहे. सीमेवरून अशा प्रकारे मोठ्या संख्येने लोकांचा येण्याचे ओघ चालू झाल्याचे दृश्य मे २०२१ मधील संकटाची आठवण करून देणारे आहे. त्या वेळी अवघ्या २ दिवसांत ८ सहस्रांहून अधिक स्थलांतरित सेउटामध्ये पोचले होते. त्या वेळी मोरोक्कोवर सीमा नियंत्रण सैल करून घुसखोरांना सेउटामध्ये जाण्याची मुभा दिल्याचा आरोप झाला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi