'तमिळनाडू हे भारतातीलच एक हिंदूबहुल राज्य आहे. तेथे ८० टक्के लोक हिंदु धर्मीय आहेत. तमिळनाडू ही रामायणाची भूमी असून ती एक शिवभूमी आहे, तसेच ती विष्णूभूमीही आहे. दक्षिण भारतात सहस्रो शिव मंदिरे आहेत.
त्यातील ५ मंदिरे ही पंचमहाभूतस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ती तमिळनाडूमध्येच आहेत. तिरुवण्णामलई आणि निण्णेकमुक्ती यांना नमस्कार केल्यावर मनुष्याच्या मनातील सर्व चिंता दूर होतात. अण्णामलई हे तेजतत्त्वाचे स्थान आहे. तिरुवण्णामलई आणि चिदम्बरम् हे आकाशतत्त्वाशी संबंधित आहेत. कांचीपूरम्मधील एकांबरेश्वर हे शिवाचे मंदिर असून ते पृथ्वीतत्त्वाशी संबंधित आहे, शिवाचे आपतत्त्वाशी संबंधित जंबुकेश्वर मंदिर त्रिचीमध्ये आहे. देशात एकूण १०८ दिव्य क्षेत्रे आहेत. त्यापैकी ७० दिव्य क्षेत्रे केवळ तमिळनाडूमध्ये आहेत. भगवान श्रीराम यांचे कुलदेव श्रीरंगम् रंगनाथस्वामी आहेत.
तमिळनाडूप्रमाणे श्रीलंका पूर्वी हिंदुबहुल होते; पण आता श्रीलंका बुद्धभूमी झाली आहे. वर्ष १९४८ नंतर श्रीलंकेत हिंदूंची लोकसंख्या उणावत गेली आणि बौद्धांची संख्या वाढली. श्रीलंका धर्मनिरपेक्ष देश नाही. त्यामुळे आता रामायणभूमी, रावणभूमी आणि शिवभूमी यांचे त्यांना महत्त्व अल्प आहे. तमिळ लोक भक्तीमार्गी आहेत. त्यांनी सनातन धर्माची पुष्कळ भक्ती केली असून सनातन धर्माचे पुष्कळ अनुकरण केले आहे. तमिळ ही दैवी भाषा आहे. तेथील हिंदुविरोधी राजकारणी आणि द्रविड तत्त्वज्ञान यांच्यामुळे तमिळनाडूची स्थिती दयनीय आहे.
तमिळनाडूतील ८० टक्के लोक आस्तिक (देव मानणारे) आहेत. १३ टक्के लोक मुसलमान आणि ७ टक्के लोक ख्रिस्ती आहेत. तमिळनाडूतील हिंदूंना ते हिंदु आहेत, हेच कळत नाही. ते मोठ्या गर्वाने सांगतात, 'ते तमिळ आहेत.' तामिळ, म्हणजे केवळ हिंदू; परंतु राजकीय पक्षाच्या मतानुसार 'तमिळ, म्हणजे हिंदू नाहीत, ते हिंदूपेक्षा वेगळे आहेत.' तमिळनाडूत मागील १६ वर्षांपासून द्रविड पक्ष आहे. द्रविड, म्हणजे भारतविरोधी, ब्राह्मणविरोधी, हिंदु संस्कृतीविरोधी, हिंदु धर्मरक्षणविरोधी, मोदीविरोधी आणि सनातन धर्मविरोधी मताचे लोक होय. ही द्रविड चळवळ भारताचा स्वातंत्र्यलढा चालू होता, तेव्हा आरंभ झाली. त्याला रामस्वामी हा मनुष्य कारणीभूत आहे. आपले दैवत श्रीराम आहेत; परंतु द्रविड हे राम आणि रामायण यांना विरोध करणारे आहेत. रामस्वामीच्या नावात राम आहे; पण तो म्हणतो, 'द्रविडांना भारतापासून स्वतंत्र भूमी पाहिजे, ते सर्व देवता आणि मंदिरे यांच्या विरोधात आहेत.'
'श्री. अर्जुन संपथ हे कोईम्बतूर, तमिळनाडूचे असून 'हिंदु मक्कल कच्छी' (हिंदु जनता पक्ष) याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून ते हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करतात. ते धर्मांतरित हिंदूंच्या शुद्धीकरण अभियानात सक्रीय आहेत. अयोध्येमध्ये श्रीराममंदिर उभारण्यासाठी त्यांनी कोईम्बतूरमध्ये आंदोलन केले. ते श्रीलंकेतील हिंदूंच्या मानवाधिकारासाठीही संघर्ष करत आहेत. त्यांना अमेरिका, कंबोडिया, सिंगापूर, मलेशिया आदी देशांमध्ये आयोजित केलेल्या हिंदु धर्मसभांमध्ये सहभागी होण्याचा सन्मानही प्राप्त झाला आहे. त्यांनी तमिळनाडूमध्ये आध्यात्मिक प्रशासन निर्माण होण्यासाठी समर्पितरूपाने प्रयत्न केले आहेत. या कार्याच्या सन्मानार्थ त्यांना 'सॅफ्रॉन लिडर' (भगवा नेता) असे म्हणत 'हिंदु रत्न' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात येणार्या 'अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना'त प्रारंभापासून, म्हणजे वर्ष २०१२ पासून नियमितपणे उपस्थित रहातात. वर्ष २०१८ च्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
हे द्रविड लोक मंदिरासमोरच लिहितात, 'देव अस्त्विात नाही, आम्ही कुणीही हिंदु नाही.' यासाठी त्यांना ख्रिस्ती प्रचारकांकडून अर्थसाहाय्य पुरवले जाते. तमिळी लोक अतिशय चित्रपटप्रेमी आहेत. या चित्रपटांचा वापर हिंदु धर्माच्या विरोधात केला जातो. या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदुविरोध जोपासला जातो. वर्ष १९६७ मध्ये तमिळ चित्रपट अभिनेते एम्.जी. रामचंद्रन् यांनी ज्येष्ठ नेते अण्णादुराई आणि कामराज यांना हरवून त्यांचे द्रविड सरकार स्थापन केले. या द्रविड सरकारच्या काळात त्यांनी सर्व मंदिरांवर नियंत्रण मिळवले. तेथे हिंदु सल्लागार मंडळाच्या नावाखाली त्यांनी त्यांच्या पक्षातील लोकांची नेमणूक केली. सार्वजनिक सभेत ते 'देव अस्तित्वात नाही', असे म्हणतात; परंतु प्रत्यक्षात ते मंदिरांचे व्यवस्थापन पहातात.
वर्ष १९६७ नंतर तमिळनाडूमध्ये द्रविड पक्षांतील लोकांचा देवावर थोडातरी विश्वास होता. एम्.जी. रामचंद्रन् आणि जयललिता उघडपणे मंदिरात जात होते. त्यांच्या नेत्यांचे कुटुंबीयही मंदिरात जाऊन धार्मिक विधी करत होते. सध्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन आहेत. त्यांचा जावई तिरूचेंदूर मंदिरात जाऊन 'शत्रूसंहार यज्ञ' करतो; परंतु पुत्र उदयनिधी स्टॅलिन साम्यवाद्यांच्या पक्षाच्या परिषदेला जाऊन उघडपणे 'सनातन धर्म हा डासामुळे होणारा डेंग्यू आणि हिवताप (मलेरिया) रोगांसारखा आहे. त्यामुळे सनातन धर्म संपुष्टात आणणे, हे त्यांचे मुख्य ध्येय आहे', असे सांगतो.
उदयनिधी स्टॅलिन याने ख्रिस्ती पंथ स्वीकारला असून ख्रिस्ती मुलीशी लग्न केले आहे. कागदोपत्री मात्र तो हिंदु असल्याचीच नोंद आहे, तसेच त्याच्या दाखल्यावरही हिंदु म्हणून नोंद आहे; परंतु स्टॅलिनचे सरकार हिंदुविरोधी आहे. आपले हिंदू नियमितपणे देवाची उपासना करतात आणि मंदिरात जातात; परंतु निवडणुकीच्या वेळी हिंदुविरोधी 'डी.एम्.के.'ला मतदान करतात. अती प्राचीन काळापासून तमिळनाडू राज्य हिंदु आहे; पण आता तमिळनाडूतील किनारपट्टीचा भाग आणि कन्याकुमारी येथे ख्रिस्ती धर्मांतर पुष्कळ प्रमाणात झाले आहे.
ख्रिस्ती धर्मांतर आणि जिहादी आतंकवाद यांमुळे तमिळनाडूत हिंदूंची लोकसंख्या घटली आहे. तमिळनाडूमध्ये जसजशी मुस्लीम लोकसंख्या वाढत आहे, तसतशी हिंदूंंची लोकसंख्या अल्प होत आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, तरीही तमिळनाडूमध्ये हिंदूंची लोकसंख्या घटत चालली आहे. वैचारिकदृष्ट्या आज तमिळनाडूचे सरकार हिंदूंच्या पाठिशी नाही. त्यामुळे भविष्यकाळासाठी हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे.
आता मुसलमानांनी 'व्होट जिहाद' (मतदानाच्या माध्यमातून जिहाद) चा अवलंब केला आहे. कन्याकुमारीमध्ये बहुतांश हिंदूंचे धर्मांतर झाले आहे. तेथे ख्रिस्ती लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने बिशपचे राज्य आले आहे. तेथे केवळ ख्रिस्त्यांची राजवट चालू आहे. मासेमारी समाजातील १०० टक्के लोकांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला आहे. त्या भागात जिल्हाधिकार्याचे काहीही चालत नाही. कर वसुली, वीजेचे देयके, मासळी बाजाराचा दर निश्चित करणे, अशा विविध गोष्टी चर्च ठरवते. त्यामुळे कन्याकुमारीमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पी. राधाकृष्णन् यांना हरवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांच्या माध्यमातून राधाकृष्णन् यांनी येथे नवीन पूल बांधले आणि पुष्कळ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला; पण 'व्होट जिहाद'मुळे ख्रिस्ती चर्चने राधाकृष्णन् यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले. आता कन्याकुमारी आणि तोटाकुरा हे दोन जिल्हे संपूर्णपणे ख्रिस्ती चर्चच्या नियंत्रणाखाली आहेत. तेथे िहंदु तमिळ लोक अल्पसंख्यांक झाले आहेत.
चेन्नईमध्येही काही भागात मुसलमान बहुसंख्य आहेत. तेथे मुसलमानांचा 'जमात ए कायदा' कार्यवाहीत आणला जातो. जेथे जेथे ख्रिस्ती लोक बहुसंख्य होतात, तेथे तेथे ख्रिस्त्यांची राजवट चालू होते. तमिळनाडूमध्ये 'क्रिप्टो ख्रिस्ती' कार्य (हिंदु नाव आणि ख्रिस्ती काम) अधिक चालते. सध्याचे द्रमुक सरकार हे 'क्रिप्टो ख्रिस्ती' सरकार आहे. तमिळनाडूमध्ये पाँडिचेरी अंतर्भूत करून ४० पैकी ४० जागा द्रमुक संयुक्त आघाडी जिंकत आहेत; कारण तेथे हिंदूंची मते विभागली जात आहेत. मुख्यमंत्री एम्.के स्टॅलिन यांनी अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्याला त्यांच्या घरी निमंत्रित केले होते. द्रमुक सरकारने कोईम्बतूर बाँबस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दाेष सोडून दिले आहे. शहरी नक्षलवाद्यांनी थुथूकुडीमधील 'स्टरलाईट' कारखान्याला आग लावून पेटवून दिले. ही आग लावणार्या आरोपींना द्रमुक सरकारने निर्दाेष सोडून दिले, तसेच त्यांच्यावरील सर्व खटलेही रहित केले. त्या सरकारने ९० ते ९३ टक्के लोकांना २ लाखांहून अधिक पारितोषिके दिली आहेत. अशा प्रकारचा राज्यकारभार द्रमुक सरकारचा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु मक्कल कच्छी आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यामुळे आता तमिळनाडूमध्येही परिस्थिती पालटत आहे. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते अतिशय जोखीम घेऊन कार्य करत आहेत. ते तमिळनाडूमध्ये सर्वत्र फिरत आहेत. त्यामुळे हिंदूंमध्ये हळूहळू जागृती होत आहे. त्या जागृतीचा परिणाम म्हणून मागील निवडणुकीत भाजपला १२ टक्क्यांहून अधिक मते मिळाली.
तमिळनाडूमध्ये जिहाद्यांनी फतवा काढला आहे. त्यानुसार ते गेल्या अनेक वर्षात पासून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्तेना वेचून वेचून ठार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते ठार केले आहेत.
हिंदु जनजागृती समितीमुळे प्रतिवर्षी हिंदु अधिवेशनात तमिळनाडूमधून आमच्यासारखे लोक सहभागी होत आहेत. सनातन संस्थेचे आश्रम हिंदुत्वाचे उत्तम कार्य करत आहेत. तमिळनाडू एक ही एक सनातन भूमी आहे. हिंदु जनजागृती समितीचे तमिळनाडूमध्येही चांगले कार्य चालू आहे. आपण प्रथम तमिळनाडूला भगवे (हिंदुत्वयुक्त) केले पाहिजे. त्यानंतर संपूर्ण भारताला भगवे करूया. 'वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव' हा फारच चांगला महोत्सव आहे. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे', लोकमान्य टिळकांनी म्हटले होते. त्याप्रमाणे 'हिंदु राष्ट्र हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे.'
भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होत जाईल, तसे संपूर्ण जगही चांगले होईल. जगात चीन, अमेरिका, रशिया यांसारखे बलाढ्य देश जगावर वर्चस्व गाजवत आहेत; परंतु भारत देश किंवा आपले सनातन हिंदु राष्ट्र शक्तीशाली झाले, तर संपूर्ण जगात हिंदुत्व पसरेल.
सनातन हिंदु धर्म व्यापक असल्यामुळे सदैव संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार करतो. त्यामुळे प्रथम भारतात हिंदु राष्ट्र आणल्यानंतर ते जगभरात आणणे, हाच एकमेव रामबाण उपाय आहे. हिंदु धर्मात संपूर्ण जगाला लाभ मिळण्यासाठी विधी केले जातात. 'वसुधैव कुटुम्बकम् ।', म्हणजे 'संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे', असे आपल्या पुराणात सांगितले आहे. आपला सनातन धर्म सामर्थ्यशाली आहे. व्यापक दृष्टीकोन असल्यामुळे तो संपूर्ण जगासाठीही उत्तम आहे.'
- श्री. अर्जुन संपथ, संस्थापक अध्यक्ष, 'हिंदु मक्कल कच्छी', कोईम्बतूर, तमिळनाडू.

