ल्हासा (तिबेट) - तिबेटमध्ये २२ ऑक्टोबरला रात्री ७ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंप झाला. या नैसर्गिक आपत्तीत किमान १६ जणांचा मृत्यू झाला, तर ५४ जण घायाळ झाले. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर तिबेटमधील नागचू शहरात भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे शेकडो घरे कोसळली आहेत.
१. भूकंपग्रस्त भागांत साहाय्य आणि बचावकार्य तातडीने चालू करण्यात आले आहे. पीडित लोकांना साहाय्यासाठी आपत्कालीन साहित्यही पाठवण्यात आले आहे.
२. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने दिलेल्या माहितीनुसार भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी आला. भूकंपाचा केंद्रबिंदू नागचूपासून १९१ किलोमीटर पूर्व-उत्तर-पूर्वेला होता. तिबेटमध्ये १३, चीनमध्ये ४ आणि म्यानमारमध्ये एका भूकंपच्या घटनेची नोंद झाली आहे.

