Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
US Attack Iran : अमेरिकेचे इराणच्या १० हून अधिक शहरांवर आक्रमण

US Attack Iran : अमेरिकेचे इराणच्या १० हून अधिक शहरांवर आक्रमण

वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेने इराणमधील केशम, किश, काझेरून, अहवाज, अबादान, शादेगान, अरवंदकेनार, बुशेहर, जाम आणि खोरमोज या शहरांवर आक्रमण केले. केशम बेटावरील निवासी इमारतीवरील आक्रमणात एक जोडपे आणि त्यांचा २ वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला, तर इतर २ मुले घायाळ झाली.

ट्रम्प यांनी आक्रमणांपूर्वी सांगितले होते की, जॉर्डनमधील अमेरिकी सैन्य तळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता आमची पाळी आहे.

🚨 Middle East tensions escalate

The US has reportedly launched strikes on more than 10 cities in Iran after President Trump said a US military base in Jordan had been targeted by a missile, declaring, "Now it is our turn."

⚠️ Crude oil prices could surge towards $100 per… pic.twitter.com/xxrwwHEC7r

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

अमेरिका आणि सौदी अरेबिया यांनी इराकमधील इराण-समर्थित 'पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स' या सशस्त्र गटाच्या ठिकाणांवर संयुक्त हवाई आक्रमणे केली. या आक्रमणांमध्ये किमान २० सैनिक ठार झाले आणि इतर अनेक जण घायाळ झाले.

आखातातील वाढत्या तणावामुळे 'ब्रेंट क्रूड' प्रति बॅरल ९० डॉलरच्या जवळ पोचले आहे. तज्ञांचे मत आहे की, परिस्थिती आणखी बिघडल्यास किंमत १०० डॉलरपर्यंत जाऊ शकते.

इराणी नौदलाने दावा केला की, हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि आसपासच्या सागरी क्षेत्रावर त्याचे पूर्ण नियंत्रण आहे. त्याच्या अनुमतीविना कोणत्याही नौकेची वाहतूक होऊ शकत नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi