Dailyhunt
US Gold Reserve : युरोपीय देश अमेरिकेतून परत मागवत आहेत स्वतःचे सहस्रो टन सोने !

US Gold Reserve : युरोपीय देश अमेरिकेतून परत मागवत आहेत स्वतःचे सहस्रो टन सोने !

वी देहली - इराण युद्ध आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची तुघलकी मानसिकता यांमुळे युरोपातील अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ट्रम्प यांच्या संभाव्य व्यापार धोरणांमुळे निर्माण होणार्‍या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपातील देश अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात 'फेडरल रिझर्व्ह'मध्ये ठेवलेले त्यांचे सोन्याचे साठे परत मायदेशी नेण्याच्या सिद्धतेत आहेत.

🚨 U.S. Gold Reserve Shocker! 🇺🇸📉

European nations are reportedly pulling thousands of tons of their gold back from the U.S.! 🌍💰

🚩 The Catalyst: Concerns over "unpredictable" leadership and shifting political mindsets.

🇵🇱 🇭🇺 🇩🇪 Who's involved? Major players like Poland,… pic.twitter.com/6qMbybieOT

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

अनेक दशकांपासून युरोपातील अनेक देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांचे सोन्याचे साठे 'फेडरल रिझर्व्ह'च्या तिजोरीत ठेवले आहेत. ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणामुळे युरोप आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जर अमेरिकेने आर्थिक निर्बंध किंवा व्यापार युद्ध छेडले, तर आपले सोन्याचे साठे गोठवले जाऊ शकतात किंवा त्याचा वापर दबावासाठी केला जाऊ शकतो, अशी भीती युरोपीय देशांना वाटत आहे.

पोलंड, हंगरी आणि इतर काही मध्य युरोपीय देशांनी त्यांचे सोन्याचे साठे परत नेण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. जर्मनीसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेने यापूर्वीच तिचे अर्धे सोने न्यूयॉर्कमधून फ्रँकफर्ट (जर्मनी) येथे हलवले आहे. आता उर्वरित साठ्यासंदर्भातही हालचाली चालू झाल्या आहेत.

कोणत्याही देशाच्या चलनाचे मूल्य आणि आर्थिक स्थैर्य हे त्या देशाच्या सोन्याच्या साठ्यावर अवलंबून असते. युद्ध किंवा जागतिक आर्थिक मंदी यांच्या काळात सोने हे सर्वांत सुरक्षित साधन मानले जाते. रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्‍चात्त्य देशांनी रशियाच्या परकीय चलनाचे साठे गोठवले होते. त्यातून धडा घेत आता युरोपातील देश स्वतःच्या संपत्तीवर स्वतःचे पूर्ण नियंत्रण ठेवू इच्छितात.

जर मोठ्या प्रमाणावर सोने अमेरिकेतून बाहेर काढले गेले, तर डॉलरच्या जागतिक वर्चस्वाला धक्का बसू शकतो. तसेच यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi