Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाळपई परिसरात नळातील पाण्यातून किडे येणे चालूच

वाळपई परिसरात नळातील पाण्यातून किडे येणे चालूच

वाळपई - येथे नळाच्या पाण्यातून पांढर्‍या रंगाची कीड येत आहे. वाळपई नगरपालिका क्षेत्रातील वाळपई-म्हाऊस मार्गावरील सिद्धेश च्यारी यांच्या घरात २८ एप्रिलला हा प्रकार घडला आणि काही क्षणातच परिसरात खळबळ माजली.

प्रारंभी ही केवळ अपवादात्मक घटना असावी, असे वाटले; मात्र २९ एप्रिलला परिस्थिती आणखी गंभीर बनली. पाणीपुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांनाही पाण्यात कीड सापडली. यामुळे सरकारने तातडीने आवश्यक कारवाईला आरंभ केला आहे. कीड आणि पाण्याचे निरनिराळे नमुने गोळा करून पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. संपूर्ण जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. नागरिकांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi