Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'व्हॉट्सअ‍ॅप'च्या 'स्टेट्स'वरून अल्पवयीन मुलांचे अल्पवयीन मुलावर आक्रमण !

'व्हॉट्सअ‍ॅप'च्या 'स्टेट्स'वरून अल्पवयीन मुलांचे अल्पवयीन मुलावर आक्रमण !

पुणे - तळेगाव दाभाडे परिसरात 'व्हॉट्सअ‍ॅप'च्या 'स्टेट्स'वरून वाद झाला. एका अल्पवयीन मुलाने ठेवलेल्या 'स्टेट्स'चा राग धरून त्या मुलावर काही अल्पवयीन मुलांनी कोयत्याने आक्रमण केले.

या घटनेनंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी तातडीने हालचाल करून काही घंट्यांच्या आत आक्रमण करणार्‍या ४ अल्पवयीन मुलांना कह्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले.

वरुळे येथे ३० ऑगस्ट या दिवशी एक खुनाची घटना घडली. त्यात काही अल्पवयीन संशयितांना पकडून बालसुधारगृहात पाठवले होते. ते नुकतेच बाहेर आले. एका अल्पवयीन मुलाने 'व्हॉट्सअप स्टेट्स'वर 'किंग इज बॅक' असा संदेश ठेवला होता. हे पाहून काही अल्पवयीन मुले संतापली होती. घायाळ मुलगा एका कपड्याच्या दुकानात काम करतो. २० ऑक्टोबर या दिवशी त्या दुकानाच्या बाहेर दबा धरून बसलेल्या ४ अल्पवयीन मुलांनी दुकानात प्रवेश करून पीडित मुलावर कोयत्याने आक्रमण केले. या आक्रमणात मुलाच्या डोक्याला, पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यात उजव्या हाताचा अंगठा तुटला. काही ओळखीच्या लोकांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi