विरार (जिल्हा पालघर) - सकाळी ८.२८ वाजता असणार्या विरार-चर्चगेट या नेहमीच्या गाडीच्या ऐवजी तिथे वातानुकूलित रेल्वेगाडी चालू केली गेल्याने नेहमीच्या प्रवाशांनी स्थानकात काही काळ 'रेल्वे बंद' आंदोलन केले.
दैनंदिन नियोजन विस्कळीत झाल्याने संतापलेल्या प्रवाशांनी सांगितले की, तुम्ही वातानुकूलित गाडी चालू करा; परंतु ही नेहमीच्या वेळची सामान्य गाडीची वेळ पालटू नका.
या वेळी प्रवाशांनी या वेळी स्थानक अधिकार्यांना (स्टेशन मास्टरना) निवेदन दिले.

