Dailyhunt
चैत्र पाैर्णिमेनिमित्त द्राक्षांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर

चैत्र पाैर्णिमेनिमित्त द्राक्षांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने चैत्र पाैर्णिमा, गुरुवार आणि हनुमान जयंती असा त्रिवेणी याेग एकाच दिवशी आल्याचे औचित्य साधत मंदिरात द्राक्षांची आरास करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे पंढरपूरचे द्राक्ष बागायतदार प्रकाश कुलकर्णी यांच्यातर्फे ही आरास करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम-जहागीरदार म्हणाले, की या सजावटीत 50 किलाे द्राक्षे, 25 किलाे खरबूज आणि 25 किलाे कलिंगड लावण्यात आले.शनिवारी या सर्व फळांचे विविध वृद्धाश्रम आणि अनाथालयांत वाटप करण्यात येणार आहे. दत्तभ्नत विजया गायकवाड आणि अंजली देशपांडे यांच्या हस्ते चैत्र पाैर्णिमेनिमित्त मासिक दत्तयाग संपन्न झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand