Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चाळिशी ओलांडल्यानंतर अनेकांना चष्मा का लागतो ?

चाळिशी ओलांडल्यानंतर अनेकांना चष्मा का लागतो ?

याची चाळीशी ओलांडल्यानंतर अनेकांना एक नवीन अनुभव येताेवर्तमानपत्र वाचताना अक्षरे धूसर दिसू लागतात, माेबाईलवरील संदेश वाचण्यासाठी हात लांब करावा लागताे किंवा शिवणकाम, लेखन यांसारखी जवळची कामे करताना त्रास हाेताे.

अशा वेळी अनेक जण प्रथमच चष्मा वापरण्यास सुरुवात करतात. त्यामुळे प्रश्न पडताे की, चाळीशीतच चष्मा का लागताे?

यामागील मुख्य कारण म्हणजे प्रेस्बायाेपिया (झीशीलूेळिर) हा डाेळ्यांमध्ये वयानुसार हाेणारा नैसर्गिक बदल. आपल्या डाेळ्याच्या आत एक पारदर्शक भिंग (लेन्स) असते. हे भिंग जवळच्या आणि दूरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सतत आकार बदलत असते. तरुण वयात हे भिंग लवचिक असते, त्यामुळे जवळचे आणि दूरचे दाेन्ही स्पष्ट दिसते.

मात्र वय वाढत जाईल तशी या भिंगाची लवचिकता कमी हाेत जाते.

परिणामी जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करणे कठीण हाेते आणि वाचनासाठी किंवा सूक्ष्म कामांसाठी चष्म्याची गरज भासते.

प्रेस्बायाेपियाची लक्षणे साधारणतः 40 ते 45 वर्षांच्या दरम्यान दिसू लागतात. वाचताना डाेळ्यांवर ताण येणे, अक्षरे अस्पष्ट दिसणे, कमी प्रकाशात वाचन कठीण जाणे, डाेकेदुखी हाेणे किंवा काम करताना लवकर थकवा जाणवणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.

ही समस्या काेणालाही हाेऊ शकते, मग त्या व्यक्तीला पूर्वी चष्मा असाे वा नसाे.

आजच्या डिजिटल युगात माेबाईल, संगणक आणि टॅबलेटचा वाढलेला वापरही डाेळ्यांचा ताण वाढवताे. मात्र स्क्रीनचा वापर हा प्रेस्बायाेपियाचे थेट कारण नसला तरी त्याची लक्षणे अधिक प्रकर्षाने जाणवू शकतात. त्यामुळे अनेकांना वाटते की अचानक डाेळे कमकुवत झाले आहेत; प्रत्यक्षात हा वयानुसार हाेणारा नैसर्गिक बदल असताे.

डाेळ्यांचे आराेग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झाेप, नियमित व्यायाम आणि स्क्रीन वापरताना याेग्य विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. 20- 20-20 नियम उपयुक्त ठरताेदर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी सुमारे 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहणे. यामुळे डाेळ्यांचा ताण कमी हाेण्यास मदत हाेते.

चाळीशीत चष्मा लागणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, घाबरण्याचे कारण नाही. उलट वेळेवर तपासणी करून याेग्य चष्मा वापरल्यास दैनंदिन जीवन अधिक आरामदायी आणि कार्यक्षम बनते. त्यामुळे धूसर दिसण्याकडे दुर्लक्ष न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या दृष्टीचे आराेग्य जपा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand