Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चमेलीच्या फुलांचा सुगंध घेतल्यास स्ट्रेस कमी होण्यास निश्चित मदत होते

चमेलीच्या फुलांचा सुगंध घेतल्यास स्ट्रेस कमी होण्यास निश्चित मदत होते

म्लपित्तामुळे किंवा उष्णतेमुळे जीभेला वा ताेंडात छाले निर्माण हाेण्याचा त्रास हाेताे. त्यामुळे तिखट खारट खाल्ले की खूप त्रास हाेताे. अशावेळी चमेली पानांचा काढा करून ताेंडात धरावा लगेच आराम पडताे.

चमेलीचे पानं वाटून व्रणांवर लावावे. दात दुखत असतील तर चमेली पत्र चावावीत.

चमेलीची पाने उत्तम व्रणराेपक म्हणजेच जखमा भरून काढते.

चमेलीपत्रसिद्ध तेल लावावे. चमेलीपत्र कुष्ठघ्न आणि कण्डूघ्न सांगितले आहे.

शरीरावर खाज सुटत असेल किंवा त्वचाराेग असेल तर चमेली पत्र वाटून त्याचा लेप लावावा. खाज सुटणे कमी हाेते. अनेक त्वचाराेग उदा. एक्जीमा, फंगल इन्फेक्शन इ. मधे चमेलीपत्रसिद्ध तेल अथवा पानांचा मूळाचा लेप लाभदायक ठरताे.

डाेकेदुखी असेल तर चमेलीच्या मूळांचा काढा करुन त्याचा परिषेक करतात. शिरःशूल चक्कर येणे अथवा मानसिक दाैर्बल्यात चमेली तेलाने डाेक्याला मालिश केल्याने आराम मिळताे.

थंडीमुळे किंवा पाण्यात सतत काम करण्याने तळपायाला भेगा पडतात, अशावेळी चमेलीची पाने वाटून लेप भेगांवर लावावा, जखमा लवकर भरतात. चमेलीपत्र सिद्ध तेलाने हळूहळू मालीश करावी, त्यामुळे तळपाय पुन्हा मऊ व प्राकृत हाेतात.

कान दुखणे, कानात स्त्राव निघणे अशा तक्रारीवर पानांनी सिद्ध तेल कानात टाकल्यास त्रास कमी हाेताे.

मासिक स्त्राव व्यवस्थित हाेत नसेल किंवा अवराेध असेल तर पत्र व पुष्प लेप ओटीपाेटावर लावतात.

अतिकाम किंवा कमी झाेप यामुळे चिडचिडेपणा मानसिक अस्वस्थता जाणवते. अशावेळी चमेलीच्या फुलांचा सुगंध घेतल्यास स्ट्रेस कमी हाेण्यास मदत हाेते. अराेमाथेरपी प्रमाणे याचा उपयाेग हाेताे. चमेली पुष्प वाजीकर आहेत, या फुलांचा सुगंध वाजीकरण करणारा आहे.

रक्तविकारांवर चमेली प्रभावी कार्य करते. अनेक औषधी कल्पांमधे चमेलीचा वापर करण्यात येताे.

जात्यादी तेल, जात्यादी घृत इ. चमेली वापरून केलेली औषधी कल्प आहेत. गंडूष चिकित्सा, लेप, कवलधारण, मालीश तसेच आभ्यंतर सेवनाकरीता वैद्य चमेली कल्पांचा वापर करतात. अशी ही चमेली, उत्तम त्वक् राेगहर, मुखराेगहर व्रण राेपक व याची फुले उत्तम वाजीकर व साैमनस्यजनन करणारे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand