Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आज आणि उद्या चर्चासत्र

दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आज आणि उद्या चर्चासत्र

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर (आ.प्र.) :

त्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांसंदर्भात विविध अंगांनी चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत दाेन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयाेजन करण्यात आले आहे.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या विद्यमाने जयिष्णू : सहिष्णू भारताचे रक्षक या विषयावर 2 व 3 सप्टेंबरला जेएनयूच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे चर्चासत्र हाेणार आहे.

शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे केवळ युद्ध आणि पराक्रमाच्या दृष्टिकाेनातून न पाहता त्यांची प्रशासन व्यवस्था, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, मराठा आरमार, संस्कृत साहित्यातील शिवरायांचे संदर्भ, तसेच पुढील काळातील मराठ्यांचा दिल्लीवरील प्रभाव अशा विविध पैलूंवर चर्चासत्रात तज्ज्ञांकडून विचारमंथन केले जाणार आहे.

जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्रचे उद्घाटन हाेणार आहे. तंजावर घराण्याचे प्रतिनिधी श्री. बाबाजी भाेसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक प्रशांत खेडेकर, विचारवंत मुकुल कानिटकर या वेळी उपस्थित राहतील.खासदार डाॅ. सुधांशू त्रिवेदी एक हजार वर्षांचा हिंदू प्रतिकार या विषयावर विचार मांडतील. तसेच, शिवरायांचा राज्याभिषेक व प्रशासन, महाराजांची दक्षिण माेहीम आणि संस्कृत साहित्यातील शिवरायांचे संदर्भ या विषयांवर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

पहिल्या दिवसाचा समाराेप कवी भूषण यांच्या काव्यावर आधारित शिवराज भूषण या महानाट्याने हाेणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand