Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एका वर्षात 75,000 भारतीयांनी ब्रिटन साेडले

एका वर्षात 75,000 भारतीयांनी ब्रिटन साेडले

मेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये (यूके) परदेशी नागरिकांमध्ये, विशेषतः भारतीयांमध्ये एक वाईट ट्रेंड दिसून येत आहे. एकीकडे, विद्यार्थी व्हिसावर अमेरिका आणि ब्रिटनला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे, तर दुसरीकडे, केवळ एका वर्षात 75,000 भारतीयांनी ब्रिटन साेडले आहे.यूकेच्या गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारच्या कठाेर व्हिसा धाेरणामुळे देश साेडून जाणाऱ्या परदेशी नागरिकांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे.एका सरकारी अहवालानुसार, 2025 या वर्षात एकूण 1,70,000 परदेशी नागरिकांनी ब्रिटन साेडण्याचा निर्णय घेतला, ज्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक हाेती.

वर्षाच्या याच कालावधीत, विद्यार्थी व्हिसावर यूकेमध्ये आलेल्या 51,000 भारतीय विद्यार्थ्यांनी ब्रिटन साेडून मायदेशी परत येणे किंवा दुसऱ्या देशात जाणे याेग्य मानले आहे.

राेजगारासाठी (वर्क व्हिसा) गेलेल्या भारतीयांपैकी 21,000 जणांनी ब्रिटनला निराेप दिला आहे. याशिवाय, विविध कारणांसाठी यूकेमध्ये स्थायिक झालेल्या आणखी 3,000 भारतीयांनी, म्हणजेच एकूण 75,000 लाेकांनी ब्रिटन साेडले आहे. ब्रिटन साेडणाऱ्यांच्या यादीत भारतापाठाेपाठ चीन 46,000 नागरिकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान आणि नायजेरिया 19,000 नागरिकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.ब्रिटनमध्ये येणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 47 ट्न्नयांची माेठी घट सरकारी आकडेवारीनुसार एक धक्कादायक बाब समाेर आली आहे की, अलीकडच्या वर्षांत कामाशी संबंधित व्हिसावर ब्रिटनमध्ये येणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 47 ट्न्नयांची लक्षणीय घट झाली आहे. 2021 साली, काेविड महामारीनंतर ब्रिटनने एक नवीन आणि कठाेर व्हिसा धाेरण लागू केले. त्यानंतर ब्रिटनमध्ये सतत पंतप्रधान बदलत राहिले आणि त्यांच्यासाेबत धाेरणातही सतत बदल हाेत गेले, ज्याचा परदेशी पर्यटक आणि विद्यार्थ्यांवर थेट नकारात्मक परिणाम झाला.

या मुद्द्यावर, सध्याच्या लेबर पार्टी सरकारच्या गृहमंत्री शबाना महमूद यांनी या आकडेवारीचा बचाव करत म्हटले की, हा आकडा मागील कंझर्व्हेटिव्ह पार्टी सरकारच्या काळातील असून, ताे त्यापेक्षा खूपच कमी आहे. कंझर्व्हेटिव्ह सरकारच्या काळात 9.44 लाख परदेशी नागरिकांनी देश साेडला.या श्रेणीत भारतीय अजूनही आघाडीवर : नवीन व्हिसा धाेरणाचे गंभीर परिणाम हाेऊनही, ब्रिटनने कुशल कामगार आणि आराेग्यसेवा क्षेत्रात भारतीयांना आकर्षित करण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. या व्हिसा श्रेणीअंतर्गत ब्रिटनने 1.07 लाख भारतीयांचे स्वागत केले आहे, तर 86 हजारांसह नायजेरिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. काैशल्य- आधारित व्हिसा मिळवण्यातही भारतीय जगात पहिल्या क्रमांकावर आहेत. ब्रिटनने एका वर्षात 89,851 भारतीयांना हे व्हिसा मंजूर केले आहेत, तर 16,607 नागरिकांसह पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. पदवीवर आधारित व्हिसांमध्ये 70 हजार भारतीयांचा समावेश आहे आणि प्रायाेजित व्हिसा मिळवण्यातही भारतीय नागरिक जगात आघाडीवर आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand