Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गूढ उलगडले : महिलांमध्ये हृदयाची गती वाढवणारी जनुके असतात

गूढ उलगडले : महिलांमध्ये हृदयाची गती वाढवणारी जनुके असतात

संध्यानंद.काॅम

नेक दशकांपासून डाॅक्टर आणि संशाेधक एका मूलभूत हृदयाच्या लयविषयक गुढाचा शाेध घेत आहेत : महिलांच्या हृदयाची धडधड अधिक वेगवान का असते, तर पुरुषांना अ‍ॅट्रियल फायब्रिलेशन (अऋळल) सारख्या अनियमित हृदयाच्या ठाेक्यांचा त्रास हाेण्याची शक्यता अधिक का असते?

ओहायाे स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटर येथील एका नव्या अभ्यासामुळे या प्रश्नावर काही प्रकाश पडला आहे. या संशाेधनातून असे दिसून आले आहे की सिनाेअ‍ॅट्रियल नाेड (डअछ) हृदयातील एक लहान पण अत्यंत प्रभावी रचना, जी नैसर्गिक पेसमेकर म्हणून कार्य करते आणि हृदयाच्या प्रत्येक सामान्य ठाेक्याची सुरुवात करते.

पुरुष व महिलांमध्ये वेगवेगळ्या जनुकीय आराखड्यावर कार्य करते. अभ्यासात असे आढळले की, महिलांमध्ये हृदयाची गती वेगाने हाेण्यास मदत करणारी जनुके असतात, तर पुरुषांमध्ये अशा जनुकीय प्रणाली आढळतात ज्या अ‍ॅट्रियल फायब्रिलेशनसारख्या हृदयविकारांना कारणीभूत ठरू शकतात. हे संशाेधन अमेरिकन हार्ट असाेसिएशनच्या उळीर्लीश्ररींळेप: अीीहूींहाळर रपव एश्रशलीीेंहिूीळेश्रेसू या नियतकालिकात नुकतेच प्रकाशित झाले आहे. ओहायाे स्टेट युनिव्हर्सिटीतील शरीरक्रियाशास्त्र व पेशीजीवशास्त्राचे प्राध्यापक तसेच उेीळपपश ऋीळलज्ञ ठशीशरीलह उहरळी ळप कशरीीं ऋरळर्श्रीीश रपव अीीहूींहाळर चे प्रमुख व या अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक वॅदिम फेडाेराेव्ह, झहऊ यांनी सांगितले की, डअछ कसे कार्य करते यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जनुकांवर लिंगाचा प्रभाव असताे, हे आम्ही प्रथमच शाेधून काढले आहे.

ते पुढे म्हणाले की, महिलांच्या हृदयाचे ठाेके सामान्यतः अधिक वेगवान का असतात आणि त्यांना अनुचित सायनस टॅकीकार्डियाचा धाेका अधिक का असताे, तसेच पुरुषांना हार्ट रेट डिसऑर्डर, कंडक्शन ब्लाॅक आणि अ‍ॅट्रियल फायब्रिलेशनचा धाेका अधिक का असताे, हे समजून घेण्यास या निष्कर्षांमुळे मदत हाेते.

ओहायाे स्टेट युनिव्हर्सिटीच्या ऊेीेींहू च. ऊर्रींळी कशरीीं रपव र्ङीपस ठशीशरीलह खपीींर्ळीीींंश आणि इेल रपव उेीीळपश ऋीळलज्ञ उशपींशी षेी कशरीीं ऋरळर्श्रीीश रपव अीीहूींहाळर येथील संशाेधकांनी दान केलेल्या मानवी हृदयांचे परीक्षण केले.

हृदयाच्या नैसर्गिक पेसमेकरसाठी जबाबदार असलेल्या पेशींमध्ये असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण जनुकसमूहांचा शाेध घेण्यासाठी हे संशाेधन करण्यात आले.

संशाेधकांनी हृदयाची गती नियंत्रित करणे, चयापचय, दाह आणि फायब्राेटिक रिमाॅडेलिंग यांच्याशी संबंधित जनुके आणि त्यांचे कार्यमार्ग तपासले. त्यातून जैविक लिंगाशी संबंधित वेगवेगळे नमुने आढळले.

संशाेधनासाठी ही हृदये अवयवदान करणाऱ्या कुटुंबांनी ङळषशश्रळपश ेष जहळे या संस्थेमार्फत दान केली हाेती.

अभ्यासाच्या सहलेखिका आणि ओहायाे स्टेटच्या संशाेधन सहाय्यक प्राध्यापक निंग ली, चऊ, झहऊ यांनी सांगितले की, महिलांच्या हृदयात ढइद3 आणि कउछ1 या जनुकांचे प्रमाण अधिक हाेते. ही दाेन्ही महत्त्वाची जनुके हृदयाचे ठाेके अधिक वेगाने हाेण्यास मदत करतात. याउलट, पुरुषांच्या हृदयात दाह आणि काेलेजन निर्मितीशी संबंधित जनुकीय प्रणाली अधिक सक्रिय असल्याचे आढळले. या प्रक्रियेमुळे विद्युत संकेतांमध्ये अडथळा निर्माण हाेऊ शकताे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand