Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कुंभमेळ्यासाठी साधुग्राम व्यवस्थेचा आढावा

कुंभमेळ्यासाठी साधुग्राम व्यवस्थेचा आढावा

नाशिक, 26 ऑगस्ट (आ.प्र.) :

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम आणि मंडप व्यवस्थेच्या नियाेजनाचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आढावा घेतला. साधुग्राममध्ये उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या सुविधा, विविध पायाभूत साेयी, पाणी-वीज व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा; तसेच संबंधित यंत्रणांच्या जबाबदाऱ्यांचे एकत्रित नियाेजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

प्राधिकरणाचे आयु्नत शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापालिका आयु्नत मनीषा खत्री, अतिर्नित आयु्नत प्रदीप चाैधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल; तसेच प्राधिकरणाचे अतिर्नित आयु्नत कमलाकर रणदिवे, सहायक आयु्नत अमाेल चाैधरी, तहसीलदार मकरंद दिवाकर व पाेलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते.

साधुग्राममध्ये आखाड्यांसाठीचे मंडप, सार्वजनिक निवास व्यवस्था, कुंभमेळा कार्यालये, सेक्टर कार्यालये तसेच व्हीआयपी कॅम्प आदींच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या मंडप व्यवस्थेसाेबतच वीज, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, स्वच्छता, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, पाेलीस व अग्निशमन सेवा, रुग्णालये आणि प्रथमाेपचार केंद्रांचाही एकत्रित विचार करण्यात आला.

विविध विभागांची कार्यालये, पाेलास आणि अग्निशमन विभागांच्या गरजा, मीडिया सेंटर, रुग्णालये तसेच मंडप व्यवस्थेसाठी आवश्यक इतर बाबींचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand