Dailyhunt
ले. ज. धीरज सेठ यांनी लष्कर उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला

ले. ज. धीरज सेठ यांनी लष्कर उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारला. खडकवासल्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीचे माजी विद्यार्थी असलेले ले.ज. सेठ डिसेंबर 1986 मध्ये लष्करात दाखल झाले हाेते.

गेल्या सुमारे 4 दशकांच्या कालावधीत त्यांनी महत्त्वाच्या विविध पदांवर काम पाहिले आहे.वाळवंटी भागात चिलखती तुकडीचे, विकसित क्षेत्रात चिलखती ब्रिगेडचे आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविराेधी दलाचे नेतृत्व केले आहे. लेफ्टनंट जनरल पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी सुदर्शन चक्र काेरचे प्रमुख म्हणून काम पाहिले.दिल्ली क्षेत्रात जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम करताना त्यांनी महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची जबाबदारी सांभाळली. लष्करी कमांडर म्हणून पदाेन्नती मिळाल्यावर त्यांनी दक्षिण पश्चिम कमांड आणि दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून सेवा बजावली. पश्चिम सीमेवरील दाेन महत्त्वाच्या कमांड्सचे नेतृत्व करण्याचा दुर्मीळ बहुमान त्यांना मिळाला आहे. लष्करी क्षमता विकास आणि आधुनिकीकरणात त्यांचे माेठे याेगदान राहिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand