Dailyhunt
माणसाचे जगणे हे यांत्रिक हाेत चालले आहे

माणसाचे जगणे हे यांत्रिक हाेत चालले आहे

जचे युग हे यंत्रयुग आहे. यंत्रेच सर्वकाही करतात. बेरीज, वजाबाकी, टंकलेखन, संगणक संवाद, प्रवास, स्वयंपाक, वस्त्रनिर्मिती हे सगळे यंत्रांच्या साहाय्याने चालते.संगणकावर टायपिंगची सवय लागल्यामुळे आता काही दिवसांनी तर हस्ताक्षरही नाहिसे हाेईल.

गाड्या माेटारमुळे चालणे टाळत असल्याने पायांवर उभे राहणेही सहज श्नय हाेणार नाही. नैसर्गिक क्षमता ज्या आहेत त्या नष्ट हाेतील. सगळीच कामे झटपट हाेत असल्याने प्रतीक्षा करण्याची सहनश्नती कमी हाेईल. सगळेच मनाप्रमाणे व्हावे अशीच सवय लागेल. जरा काही मनाविरुद्ध झाले तर र्नतदाब वाढू लागेल. अपेक्षाभंग पेलण्याची क्षमता कमी हाेईल.माणसे कशानेही खचू लागतील. जीवन हे एक यंत्र झाले झाले आहे. कुठे कलाकुसर उरली नाही. सगळे देव एकाच छापाचे झाले आहेत. वेरुळच्या लेण्यांची निर्मिती करणाच्या कारागिरांच्या हातांसारखे हात यापुढे नसतील.

आता तर गाण्यांच्या, भाषणांच्या सीडीज् रस्त्यावर विक्रीसाठी मांडल्या जातात. गाण्यांच्या मैफिलींना जाण्यापेक्षा घरात बसून गाणी ऐकली जातात. पूर्वी चुलीवर भाजलेली आजीच्या हातची भाकरी खायला मिळायची पण आता चूल पाहायलाच मिळत नाही.आता तयार कपडे, तयार चपला, तयार पुरणपाेळ्या, तयार पूजा साहित्य मिळू लागले आहे.आता कुटुंबातील लाेक एकमेकांना भेटेनासे झाले आहेत.एकट्याच्या मिळकतीवर संसाराचा गाडा चालेनासा झाला आहे.मूल पाळणाघरात, आई-बाबा ऑफिसमध्ये, आजी-आजाेबा वृद्धाश्रमात असे चित्र दिसू लागले आहे. स्त्रीला तिला घरातली कामे करायला वेळ नाही. हाताने घर सजवायला वेळ नाही.

घरातल्या गाेष्टींवर कलाकुसर करायला वेळ नाही.परमेश्वर हा विश्वाचा निर्माता आहे, असे म्हटले जाते, ताे असेल किंवा नसेल. पण माणूस तरी जगत आहे ना?ताे आपल्या जीवनाचा निर्माता राहिला नाही. शिल्पकार हाेऊ शकत नाही.त्याचे जीणे कृत्रिम व यांत्रिक हाेत चालले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand