Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राचा गौरव

पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राचा गौरव

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट (आ.प्र.) :

'पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्याेग याेजनेंतर्गत (पीएमएफएमई) उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर प्रदान करण्यात आलेला पुरस्कार हा राज्यातील शेतकरी, महिला, युवा, स्वयंसहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, उद्याेजक आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची पावती आहे.

या सन्मानामुळे कृषिमालाचे अधिकाधिक मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण राेजगाराला बळ देण्याची जबाबदारी वाढली आहे,' असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पीएमएफएमई अंतर्गत उत्कृष्ट कार्यप्रणालीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्याेग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी संचालक विनयकुमार आवटे व पीएमएफएमईचे स्टेट लीड मॅनेजर अमाेल चिद्रावर उपस्थित हाेते. देशातील सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या 10 जिल्ह्यांत राज्यातील 7 जिल्ह्यांचा समावेश असल्याचे भरणे यांनी सांगितले. हा पुरस्कार केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा गाैरव असल्याचे त्यांनी नमूद केले. या याेजनेत राज्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांनाही पुरस्काराने गाैरवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी आणि अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बाेराळे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. ग्रामीण आणि शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही महाराष्ट्राने देशातील माेठ्या राज्यांच्या श्रेणीत सर्वाेत्तम कामगिरी केली आहे. राज्य ग्रामीण उपजीविका अभियानासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनाेन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील आणि अश्विनी अकुसकर यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्य शहरी उपजीविका अभियानाचा पुरस्कार सहआयु्नत नूतन खाडे आणि राज्य अभियान व्यवस्थापक प्रसाद राजेभाेसले यांनी स्वीकारला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand