Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत पन्नास ई-बस नाशिककरांच्या सेवेत दाखल

पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत पन्नास ई-बस नाशिककरांच्या सेवेत दाखल

नाशिक, 31 ऑगस्ट (आ.प्र.) :

हरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पीएम ई-बस सेवा याेजनेंतर्गत पन्नास ई-बस नाशिककरांच्या सेवेत दाखल हाेत आहेत.

या बससेवेच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. येथे पन्नास ई-बसचे लाेकार्पण करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी पालक मंत्री गिरीश महाजन, महापाैर हिमगाैरी आहेर, उपमहापाैर विलास शिंदे, आयु्नत मनीषा खत्री आदी मान्यवर उपस्थित हाेते. पीएम ई- बस सेवा याेजनेंतर्गत नाशिकसाठी मंजूर करण्यात आलेल्या 12 मीटर लांबीच्या ई-बस शहरात दाखल झाल्या आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक ई-बसचा समावेश झाल्यामुळे नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे; तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी हाेऊन शहरातील वाहतूक काेंडी कमी करण्यासही हातभार लागणार आहे. नाशिकचा विकास आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यात आणखी बस उपलब्ध हाेणार असून, त्यातून नागरिकांना अधिक व्यापक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध हाेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand