Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुरेशा झाेपेअभावी अनेक आजारांना ताेंड द्यावे लागेल

पुरेशा झाेपेअभावी अनेक आजारांना ताेंड द्यावे लागेल

न्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट ही आजच्या तरुण पिढीची गरज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. माेबाइल, लॅपटाॅप आणि टॅब यापैंकी काहीतरी इलेक्ट्राॅनिक गॅझेटस झाेपण्यापूर्वी हाताळत असल्यास याचा वाईट परिणाम तुमच्या झाेपेवर हाेण्याची दाट शक्यता आहे.

त्यातही किशाेरवयीन मुला-मुलींवर याचा माेठा परिणाम हाेत असल्याचे समाेर आलं आहे. निराेगी राहण्यासाठी स्वस्थ झाेप मिळवणे प्रयत्नांती साध्य हाेऊ शकते.समृध्दी आणि विकासाकडे वाटचाल करत असताना बहुतेक जणांना ताणतणावांना ताेंड द्यावे लागत आहे.स्पर्धेच्या या युगात धावपळ तर करावीच लागते. त्यामुळे शारीरिक दमछाक हाेतेच त्याचबराेबर वेगवेगळ्या मानसिक समस्यांनाही ताेंड द्यावे लागते. वेळेचे गणित जमवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

त्यामुळे पुरेसा आणि नियमित आहार, व्यायाम या गाेष्टींकडे दुर्लक्ष हाेते.तसेच पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या व्याधींना ताेंड द्यावे लागते.गाढ झाेपेसाठी काय करावे? झाेपण्यापूर्वी थंड पाण्याने हातपाय धुवावेत आणि लगेचच झाेपण्याचा प्रयत्न करावा. झाेपण्याच्या खाेलीतील वातावरण आणि अंथरूण स्वच्छ असावे. खाेलीत मंद वासाची उदबत्ती लावावी. या सवयी राेजच अंमलात आणाव्यात. त्यामुळे शांत झाेप लागण्यास मदत हाेते. कामाचा प्रचंड ताण पडत असेल तर त्याचा झाेपेवर निश्चितपणे परिणाम हाेताे. अशा वेळी झाेपण्यापूर्वी ऋतुमानानुसार थंड किंवा गरम पाण्याने स्नान करावे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand