Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्य सेवा हक्क आयाेगाच्या नागपूर आयु्नतपदी संदीप देशमुख

राज्य सेवा हक्क आयाेगाच्या नागपूर आयु्नतपदी संदीप देशमुख

राज्य सेवा हक्क आयाेगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी संदीप जगन्नाथ देशमुख यांना आयाेगाच्या नागपूर आयु्नतपदाची, तसेच गाेपनीयतेची शपथ दिली.आयाेगाच्या कार्यालयात हा शपथविधी झाला.

यावेळी काेकण विभागाचे आयु्नत बलदेव सिंग व अमरावती विभागाचे आयु्नत अरुण डाेंगरे उपस्थित हाेते. तसेच, दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयु्नत डाॅ. किरण जाधव, नाशिक विभागाच्या आयु्नत चित्रा कुलकर्णी आणि पुणे विभागाचे आयु्नत सुधाकर तेलंग सहभागी झाले हाेते. संदीप देशमुख अपर आयु्नत तथा विशेष निबंधक सहकारी संस्था (सेवानिवृत्त) म्हणून कार्यरत हाेते. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा लाभ आयाेगाच्या कार्याला हाेणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand