Dailyhunt
समाधानी राहण्यासाठी काही टिप्स

समाधानी राहण्यासाठी काही टिप्स

शांत राहण्याचे खूप सारे फायदे असतात शांत राहूनच चिंतेला राेखू शकता. काही वेळ पुस्तके वाचण्यासाठी काढा. सकाळी किंवा संध्याकाळी चहा पिताना त्याचा सुगंध, उष्णता यांचा अनुभव घेऊन शांतपणे चहा प्या.जेव्हा राग, चिंता किंवा चिड असल्याची जाणीव हाेईल तेव्हा काही मिनिटे शांत हाेऊन दीर्घ, सखाेल श्वास घेऊन साेडू शकता.

किंवा काही वेळपर्यंत शांततेने चालू शकता.दुसऱ्यांच्या गाेपनीयतेचा सुद्धा सन्मान करा जर तुम्ही असा संकेत देत असाल की, तुम्ही चुकीचे असू शकता तर तुमच्या विचारांना महत्त्व देणे, दुसऱ्यांसाठी साेपे हाेईल. जर तुम्ही दुसऱ्यांच्या विचारांबाबत खुला दृष्टीकाेन ठेवत असाल, तर लाेक तुमच्याविषयी खुला दृष्टीकाेन ठेवतील. चांगल्या संवादासाठी दुसऱ्यांच्या गाेपनीयतेचा सन्मान करा आणि स्वत:ची गाेपनीयता सुरक्षित ठेवा.

माेठ्या कामाची लहान भागांमध्ये विभागणी करा जेव्हा आपण काेणते काम करण्याची याेजना बनविताे, आणि ती पूर्ण हाेऊ शकत नाही, तेव्हा आपल्या यादीला नवीन पद्धतीने बनवावे लागेल. यादीत अनेक माेठ्या कामांना सामील करण्याऐवजी माेठ्या कामांना लहान भागांमध्ये ताेडले तर ती पूर्ण करणे साेपे हाेईल. माेठ्या कामांना अनेक तुकड्यांमध्ये विभागूनच ठीक असते. तेव्हाच ते काम वेळेवर पूर्ण हाेण्याची श्नयता असते.त्वरित इच्छा पूर्ण करण्याचा विचार करू नका इच्छा त्वरित पूर्ण करण्याची आवड, प्रत्यक्षात तुम्हाला मागे ढकलते. तुम्हाला लगेच ते कळत नाही, पण नंतर तुम्ही अडचणींनी घेरल्याचे तुम्हाला कळते. लक्षात ठेवा एक बीज एका विशाल वृक्षात तेव्हा बदलते, जेव्हा त्याची देखभाल केली जाते. काळजी घेतली जाते. कठाेर मेहनतीनंतरच त्याचे रूपांतर मजबूत वृक्षात हाेते आणि ते फळ देऊ लागते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand