Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सायबर गुन्हेगारीविरोधात रत्नागिरीत महा जनजागृती मोहीम राबवणार : सामंत

सायबर गुन्हेगारीविरोधात रत्नागिरीत महा जनजागृती मोहीम राबवणार : सामंत

रत्नागिरी, 31 ऑगस्ट (आ.प्र.) :

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालून जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 849 ग्रामपंचायतींत एकाच दिवशी महा जनजागृती माेहीम राबवण्यात येणार आहे.

पाेलीस, बँका आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थेट गावागावांत जाऊन महिला, ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालक मंत्री उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धाेक्याच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पाेलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सायबर पाेलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांच्यासह प्रमुख बँक अधिकारी उपस्थित हाेते.

पाेलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर गुन्हेगारी आणि त्याला प्रतिबंधाबाबत माहिती दिली. सायबर गुन्हेगारीविराेधातील लढाई लाेकचळवळ झाली पाहिजे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand