राेजच्या व्यवहारात कशा रीतीने वागावे व त्यामुळे नेतृत्व कसे प्राप्त हाेऊन म ाणूस ख्यातकीर्त हाेऊ शकताे, याचे दिग्दर्शन श्रीसमर्थांनी 'बुद्धिवादनिरूपण' या सहाव्या समासात केले आहे.
श्रीसमर्थांचा निस्पृहपणावर, निर्लाेभी वृत्तीवर आणि बुद्धिवादावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे ते सांगतात, की जाे स्वत: निस्पृह नाही त्याच्यावर लाेकांचा विश्वास बसणे कदापिही शक्य नाही. असे लाेक बळजबरीने अनुग्रह देऊन, तर कधी एखाद्या मध्यस्थार्माफत अनुग्रह देऊ पाहतात पण त्यांचा लाेभीपणा लाेकांना समजून येताेच.
गुरू हाेण्याच्या इच्छेने भावाला, पत्नीला, एखाद्या भाेळ्या अडाण्याला शिष्य करून ते गुरूपणा मिरवू पाहतात. लाेकांना नादी लावून पैसे काढू पाहतात.कधी अंदाजाने परमार्थाची बडबड करतात, पण खरे ज्ञान व विवेक नसल्याने त्यांची फजितीच हाेतअशांच्या स्वत:जवळच नि:स्पृह वृत्ती व खरे ब्रह्मज्ञान नसल्याने त्यांचे हाेणारे शिष्यही भरंगळतात.
खरा विवेकी व परमार्थी पुरुष जसा बाेलताे तसाच वागताे, ताे निस्पृह असून विचारपूर्वकच बाेलत आणि वागत असल्याने त्याचे निर्णय अचूक असतात व म्हणूनच लाेकही त्याला मानतात. लाेकांना शंका येईल असे ताे कधीच वागत नाही आणि प्रत्येक गाेष्टीबाबत कार्यकारणभाव व सारासार विचार करूनच ताे वागताे.लाेकमानस सांभाळणे हे साेपे काम नाही. लाेकांच्या स्वैर इच्छांना वळण लावून याेग्य मार्गावर आणण्यातच अशा लाेकनेत्यांचे काैशल्य असते.लाेकनेत्याने सर्व समाज संघटित व एकजिनसी करून कार्याला लावला पाहिजे. त्याने गुळमुळीतपणा, मलिन विचार व नि:सत्व वर्तणूक साेडून सदैव उत्कट व भव्य ध्येय व आचार यांची कास धरली पाहिजे.त्याला दूरदृष्टी व परिस्थितीचा यथायाेग्य अंदाज असलाच पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याने नि:स्पृह वृत्ती ठेवली पाहिजे.

