Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

नागपूर, 21 ऑगस्ट (आ.प्र.) :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल); तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू असलेल्या विविध विकासकामांची व वैद्यकीय सुविधांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करून समाधान व्य्नत केले.

गडचिराेली जिल्ह्यातील जपतलाई येथील सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चाैकशी केली.

येथील दाेन माेठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने माेठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांची प्रगती पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी येथे भेट दिली. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांच्याही दृष्टीने या दाेन्ही रुग्णालयांत विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत; तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची निर्मिती येथे केली जात आहे.

मेडिकलमध्ये एनआयसी, पीआयसीयू येथे भेट देऊन पीआयसीयूमधील व्हेंटिलेटर युनिटचे लाेकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शस्त्रक्रियागृह, सर्जिकल आयसीयूचीही पाहणी करून कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

अधिष्ठाता डाॅ. राज गजभिये यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

गडचिराेली जिल्ह्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशाची घटना नुकतीच घडली. या घटनेतील एक विद्यार्थिनी मेडिकलमध्ये दाखल आहे.

मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थिनीची भेट घेतली तसेच तिच्या आईशी संवाद साधला.

या बालिकेच्या प्रकृतीची याेग्य काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी डाॅक्टरांना दिल्या.

अधिष्ठाता डाॅ. रवी चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sandhyanand