Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Vaishali Nagawade | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी वैशाली नागवडे तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड ;राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिले नियुक्तीपत्र

मुंबई : Vaishali Nagawade | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी वैशाली नागवडे तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड झाल्याचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली आहे. देवगिरी बंगल्यावर राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी नियुक्तीपत्र दिल्यावर वैशाली नागवडे व निखिल ठाकरे यांनी प्रदेश कार्यालयात दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेसमोर नियुक्ती पत्र ठेवून अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, कार्यालयीन सचिव संजय तटकरे आदी उपस्थित होते.

The post Vaishali Nagawade | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी वैशाली नागवडे तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड ;राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिले नियुक्तीपत्र appeared first on .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: SarkarSatta