Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता वाढणं असे अनेक प्रकारचे त्रास एरंडेल तेल प्यायल्याने बरे होतात. हे तेल पहाटे घेणं फायदेशीर ठरतं.

या तेलाचा ओशटपणा, ढेकर येणं हे त्रास टाळण्याकरिता ते सकाळी लवकर अनशापोटी घेतल्यास फायदा होतो.

एरंडेल तेलामुळे वारंवार पोट फुगणे, गच्च झाल्या सारखं वाटणे, पोट साफ न होणे या समस्या दूर होतात. हे तेल शरद आणि वसंत ऋतूत घ्यावे. वसंत ऋतुत उष्णता वाढलेली असते. यामुळे ऋतुनुसार शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि प्रकृतीत होणारे त्रास टाळण्यासाठी एरंडेल तेल प्यायल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. पोट साफ होण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या चुर्णांचा वापर करतात. यावर एरंडेल तेल प्यायल्यास फायदेशीर ठरते. कोठा साफ होण्याकरिता वर्षातून दोन वेळा तरी शरद आणि वसंत ऋतुत एरंडेल तेल प्यावे.

कसं घ्याल

सकाळी रिकाम्या पोटी एरंडेल तेल प्यायल्यास शरीराला लागू पडतं. एरंडेल तेल पिताना पोट थोडं रिकामं ठेवावं. भरपेट खाल्ल्यानंतर एरंडेल तेल घेऊ नये. प्रौढांची मात्रा वय वर्षे २० ते ८० वर्षा पर्यंत ३० मिली घ्यावे. रात्रीच्या वेळी शक्यतो अत्यंत कमी किंवा हलका आहार घ्यावा. गरम पाणी, गरम चहा किंवा गरम पेजेतून एरंडेल घेऊ शकता किंवा लिंबू पाणी, ताक यातूनही घेतलं तरी चालतं. हे तेल प्यायल्या नंतर तेलाच्या ओशटपणाचा तोंडाला आलेला त्रास जाण्यासाठी कोकम किंवा आमसूल घ्यायला हरकत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka