Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हर्षवर्धन सकपाळ यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे का?

हर्षवर्धन सकपाळ यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे का?

सकपाळ यांच्या निरर्थक आणि बिनबुडाच्या आरोपांवर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जोरदार घणाघात

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची ईडी चौकशी करण्याची मागणी ऐकून त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर आणि अकलेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे थेट अकलेचे दिवाळे निघाल्याचे स्पष्ट लक्षण असल्याचा घणाघात शिवसेना प्रवक्त्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ऐकवलेल्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये कोणतीतरी तिसरीच व्यक्ती श्रीकांत शिंदे यांनी ५०० कोटी रुपये दिल्याची अफवा पसरवत आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय, फक्त एका कथित क्लिपच्या आधारावर थेट ईडी चौकशी करून थेट अटकेची मागणी करणे, म्हणजे सकपाळ यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल उपस्थित होतो

उद्या जर कोणी दुसरी क्लिप रेकॉर्ड करून असा दावा केला की, "हर्षवर्धन सकपाळ यांना आम्ही ५०० कोटी तर सोडा, तेवढी तुमची औकात नाही, पण ५-५० हजार रुपये दिले आहेत," तर मग आम्हीसुद्धा उद्या उठून सकपाळ यांच्या अटकेची मागणी करायची का? काँग्रेसने या बालिश तर्काचे उत्तर द्यावे

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची कोणतीही पात्रता नसलेली ही व्यक्ती फक्त प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आरोपांची राळ उडवत असून त्यात कोणतेही तथ्य किंवा आधार नसल्याचे मत वाघमारे यांनी मांडले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे खोटे-खरे ओळखाणारे लोकनेते आहेत. असल्या तथ्यहीन आणि बाष्कळ आरोपांमुळे शिंदे साहेबांसारख्या लोकप्रिय नेत्याची प्रतिमा कधीही डागाळू शकत नाही. त्यामुळे सकपाळ यांनी असे स्वैर आरोप करताना आधी तथ्य नीट तपासवीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka